36 वर्षीय राहुल शर्मा मायक्रोमॅक्स मोबाइल कंपनीचे को-फाउंडर आहेत. एकेकाळी कॅबसाठी रुपये नव्हते म्हणून तब्बल 14 किलोमीटर पायी चालत गेलेले राहुल शर्मा हे त्याच्या विवाहाच्या वृत्तावरुन चर्चेत आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री असीनसोबत लवकरच राहुल विवाहबद्ध होणार आहेत. असीनचा 'ऑल इज वेल' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राहुल शर्मा 15 वर्षाचे असताना त्यांना एका रॉक कॉन्सर्टमध्ये सहभागी व्हायचे होते. मात्र, राहुल यांच्याकडे कॅबवाल्याला देण्यास रुपये नव्हते. त्यामुळे राहुल तब्बल 14 किलो मीटर पायी चालत गेले होते.
राहुल यांनी नागपूर विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सस्केचेवन विद्यापीठातून त्यांनी कॉमर्सची पदवी प्राप्त केली आहे. राहुल यांना 2013 मध्ये 'जीक्यू मॅन'चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय 2014 मध्ये फॉर्च्युन मॅग्झिनने 'ग्लोबल पॉवर लिस्ट ऑफ 2014' च्या टॉप-40 मध्ये राहुल शर्मा यांचा समावेश केला होता.
राहुलने 2008 मध्ये मायक्रोमॅक्स कंपनी सुरु केली. त्यानंतर राहुल यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा राहुल यांचा चांगला मित्र आहे. राहुलने कंपनी सुरु केली तेव्हा अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने त्यांना सहकार्य केले होते. राहुल यांच्या विवाहासाठी देखील अक्षय आणि ट्विंकलनेच पुढाकार घेतला आहे. राहुल आणि असीनची भेट अक्षयनेच घडवून आणली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा यांचे फोटो...