आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात काकांचे डोळे गेल्यावर विशालने बनवला 'व्हाइस कमांड' ऐकणारा सहकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - सिलिकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप कंपनी "वांड लॅब्ज' खरेदी करण्याची घोषणा मायक्रोसाॅफ्टने केली आहे. भारतवंशीय विशाल शर्मा यांची ही कंपनी अॅप्सला जोडणारे "मेसेजिंग इंटरफेस' तयार करते. यामुळे ऑटोमेशनची प्रकिया सुलभ होते. भविष्यात याला जास्त मागणी राहणार असल्याचा मायक्रोसॉफ्टचा दावा आहे. यामुळे मशीनच्या कामाची क्षमता वाढण्यास मदत होईल. यात किती रुपयांचा व्यवहार झाला याबाबत मात्र दोन्ही कंपन्यांनी माहिती दिलेली नाही. मायक्रोसॉफ्टने याच आठवड्यात सोमवारी लिंक्डइन कंपनी १.७५ लाख कोटी रुपयांत विकत घेणार असल्याची घोषणा केली होती.

दिल्ली आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या विशालने तीन महिन्यांपूर्वीच ही कंपनी स्थापन केली होती. याआधी ते अनेक मोठ्या कंपन्यांसाठी काम करत होते. त्यांच्या कंपनीने अॅपलच्या आय-ऑपरेटिंग सिस्टिम तसेच अँड्रॉइडसाठीदेखील अॅप बनवलेले आहे मात्र, अद्याप ते अॅप ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाही. कंपनी सुरू करण्याआधी त्यांनी अनेक वर्षे गुगलमध्ये काम केलेले आहे. ते उत्पादन विभागात उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले होते. एका अपघातात त्यांच्या काकांची दृष्टी गेले, त्या वेळी त्यांनी "व्हाइस कमांड' एेकणारा डिजिटल असिस्टंट "जॅकब' बनवला होता. नंतर गुगलने याचा "गुगल नाऊ' मध्ये समावेश केला.

मायक्रोसॉफ्ट, फेसबुकच्या पुढचा विचार
या वर्षी मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुकच्या वार्षिक अधिवेशनात ‘सॉफ्टवेअर दरम्यान संवाद’ या विषयावर बरीच चर्चा झाली. मार्च महिन्यात झालेल्या या अधिवेशनात मायक्रोसॉफ्ट सीईओ नडेला यांनी सांगितले की, ‘मी अशा भविष्याची कल्पना करत आहे, ज्यात सॉफ्टवेअर आपली भाषा समजू शकेल, लोकांसोबत सर्वसामान्याप्रमाणे बाेलू शकेल’ मायक्रोसॉफ्ट यासाठी ‘कन्व्हर्सेशनल इंटेलिजेन्स’ वर काम करत आहे. आम्ही याबाबत त्यांच्या पुढे असून दीड ते दोन वर्षांपूर्वीच आम्ही यावर काम सुरू केले असल्याचे विशालने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...