आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्या नाडेला यांच्या पगारात ४ कोटी रुपयांची घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - मूळ भारतवंशीय असलेले मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांच्या वार्षिक पगारात चार कोटी रुपयांची (३.३ %) घट झाली आहे. या वर्षी जूनमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांना पगारापोटी एकूण ११७.६३ कोटी रुपये मिळाले. यामध्ये २९.२४ कोटी रुपयांच्या बोनसचा समावेश आहे. गेल्या वर्षी जून २०१५ मध्ये त्यांना एकूण १२१.६२ कोटी रुपये मिळाले होते.

कंपनीच्या स्टॉक्स अवॉर्डमध्ये ६.२५ टक्के घट झाल्यामुळेच ४९ वर्षीय नाडेला यांच्या वार्षिक पगारातही घट झाली आहे. नाडेला यांना या वर्षी मिळालेल्या पगाराच्या पॅकेजमध्ये मूळ पगाराच्या (बेसिक) स्वरूपात ७.९८ कोटी रुपये, २९.९१ कोटी रुपयांचे बोनस, ७९.७५ कोटी रुपयांचे स्टॉक अवॉर्ड आणि इतर कम्पनसेशनच्या स्वरूपात मिळालेले ९.३७ लाख कोटी रुपयांचा समावेश आहे.

अमेरिकी बाजार नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन’कडे दाखल करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. नाडेला यांच्या मूळ पगारात कोणताच बदल झालेला नसल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे, तर बोनसमध्ये देखील ३.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, स्टॉक अवॉर्डमध्ये ६.२५ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या स्टॉकचे अवॉर्ड मूल्य ८५.०७ कोटी रुपये होते.
ते या वर्षी कमी झाले असून ७९.७५ कोटी रुपयांवर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...