आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांनी घर काढले विक्रीला! ‍किंमत 23 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ सत्या नडेला यांनी आपले घर विक्रीला काढले आहे. नडेला लवकरच 'क्लाइड हिल' भागातील दुसर्‍या घरात राहायला जाणार आहेत.

सत्या नडेला सध्या राहात असलेले घर त्यांनी ऑगस्ट 2000 मध्ये 13.85 लाख डॉलर (9.25 कोटी रुपये) मध्ये खरेदी केले होते. दरम्यान, 48 वर्षीय नडेला 1992 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू झाले होते. 2014 मध्ये त्यांना सीईओपदी बढती मिळाली होती.

नडेलांच्या घरात काय आहे खास?
- नडेलांनी क्लाइड हिलमधील आपले राहाते घर विक्रीला काढले आहे. या घराची किंमत 3.488 मिलियन डॉलर अर्थात 23.3 कोटी रुपये आहे.
- 1963 मध्ये हे घर बांधण्यात आले होते. घराच्या बाहेरील भिंती काचाच्या आहेत.
- घराजवळून वॉशिंग्टन व माउंट ओलिम्पसचे विलोभनिय दृश्य पाहाता येते.
- घरात बसून सिएटल शहर देखील पाहाता येते.
- चार बेडरूम, लिव्हिंग रूम, फॅमिली रूम, गेस्ट रूम, तीन बाथरूम व एक ओपन किचन आहे.
> घराच्या परिसरात 4,000 स्क्वेयर फूट जागेचा ओपन स्पेस आहे.

ओबामांच्या कार्यक्रमाचे नडेलांना निमंत्रण...
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मंगळवारी देशातील जनतेशी शेवटचा संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला सत्या नडेला उपस्थित राहाणार आहेत.
- मिशेल ओबामा यांनी या कार्यक्रमाला फक्त 23 लोकांना निमंत्रित केले आहे.
- तसे पाहिले तर कार्यक्रमाचे 24 लोकांना निमंत्रित करण्‍यात आले आहे. 24 वी सीट ही अमेरिकेत गेल्या वर्षाभरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेला बळी पडलेल्या नागरिकांच्या नावाने राखीव ठेवली जाणार आहे.

नडेलांना निमंत्रण का?
- मायक्रोसॉफ्टने शाळा- कॉलेजात कॉम्प्यूटर सायन्सला प्रोत्साहन देण्यासाठी काम सुरु केले आहे.
- गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मायक्रोसॉफ्टने 500 कोटी रुपयांची घोषणा केली होती.
- मायक्रोसॉफ्टमध्ये 20 आठवड्यांच्या वेतनासोबत मॅटर्निटी लीव्हचा नियम लागू केला होता. दत्तक घेणार्‍या कर्मचार्‍यांसाठी 12 आठवड्यांची सुटी मिळेल.

पुढील स्लाइडवर पाहा, असे दिसते सत्या नडेलांचे घर...