आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft CEO Satya Nadella\'s Birthday Special Latest News

Microsoftचे CEO सत्या नडेला यांनी ज्युनियरसोबत थाटला संसार, वाचा रोचक किस्से

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी अनुपमासोबत सत्या नडेला - Divya Marathi
पत्नी अनुपमासोबत सत्या नडेला
भारतीय वंशाचे सत्या नडेला हे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'माइक्रोसॉफ्ट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. एकेकाळी या खुर्चीवर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स बसत होते.

सत्या नडेला यांचा जन्म (19 ऑगस्ट 1967) हैदराबादमध्ये झाला. हैदराबाद पब्लिक स्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मनीपाल यूनिव्हर्सिटीमधून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. नडेला यांनी 2013 मध्ये माइक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली. नडेला यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्याला त्यांच्या खासगी आयुष्यातील काही रोचक किस्से घेऊन आलो आहोत.

स्कूल ज्युनियरसोबत थाटला संसार...
'बिझनेस इंसाइडर इंडिया'नुसार सत्या नडेला यांनी हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची ज्यूनियर अनुपमा यांना खूप आवडत असे. अनुपमा यांचे वडील सत्या यांच्या वडीलांचे IAS बॅचमेट होते. अनुपमा आणि सत्या यांनी मनीपाल यूनिव्हर्सिटीत उच्च शिक्षण घेतले. या दरम्यान दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. सत्या आणि अनुपमा यांचा विवाह 23 वर्षांपूर्वी झाला. दोघांना तीन मुले असून त्यांचे कुटुंब वॉशिंग्टनमधील बेलेव्ह्यू येथे स्थायिक झाले आहे.

531 कोटी रुपयांचे पॅकेज...
एका रिपोर्टनुसार, सत्या नडेला यांना मायक्रोसॉफ्टने 84.3 मिलियन डॉलर्स (जवळपास 531 कोटी रुपये) सॅलेरी पॅकेज दिले आहे.

> बेसिक सॅलरी $918,917 (5 कोटी 86 लाख रुपये)
> कॅश बोनस $3.6 मिलियन (22 कोटी 96 लाख 27 हजार)
> व्हॅल्यु $59.2 मिलियन (387 कोटी 60 लाख 86 हजार)
> कंपनीचा वन टाइम स्टॉक नडेला यांना ऑगस्टमध्ये देण्यात आला होता. त्याची किंमत $13.5 मिलियन (86 कोटी 11 लाख)

पुढील स्लाइडवर वाचा, Microsoftचे CEO सत्या नडेला यांच्याशी संबंधित इतर 7 खास किस्से...