आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेबाइल टाॅवरची संख्या जाणार पाच लाखांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतातील वायरलेस इंटरनेट सेवांचा वाढता विस्तार लक्षात घेता पुढील सहा वर्षांत देशातील माेबाइल टाॅवरची संख्या सध्याच्या चार लाखांवरून पाच लाखांवर जाण्याचा अंदाज संशाेधनात व्यक्त करण्यात आला आहे.

पुढच्या पाच वर्षात मोबाइल टॉवरची संख्या तीन टक्क्यांनी वाढेल. त्यानुसार २०२० च्या आर्थिक वर्षात भारतातील मोबाइल टॉवर ५ लाख ११ हजारांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. यापैकी ३० हजार टॉवर इंटरनेट प्लॅन आणि डेटा साइटशी जोडले जातील, असे डेलाॅइट इंडियाच्या ‘भारतीय टाॅवर उद्याेग’ या अहवालात म्हटले आहे. सध्या देशात चार लाख माेबाइल टाॅवर आहेत. भाडेतत्त्वावर दिलेल्या मोबाइल टॉवरचे गुणोत्तर १.७७ वरून २०२० पर्यंत २.४८ वर पोहोचेल, असाही अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...