आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीचा मोबाइल वॉलेट कंपन्यांना फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने मोठ्या नोटा बंद करण्यात आल्यामुळे त्याचा तत्काळ फायदा मोबाइल वॉलेट सेवा देणाऱ्या नॉन - बँकिंग आर्थिक कंपन्यांना (एनबीएफसी) मिळाला आहे. उद्योगांची संघटना असलेल्या असोचेमच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या एका अभ्यास अहवालात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नोटबंदीनंतर चलनातील नोटांची संख्या कमी पडल्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या व्यवहारासाठी मोबाइल आणि डिजिटल पेमेंटचा वापर सुरू केला असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. नोटबंदीमुळे किरकोळ विक्रेत्यांनीदेखील आपले अनेक व्यवहार ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून केले आहेत. पीपीआय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ४५ कंपन्या देशात सध्या आपली सेवा देत आहेत. मात्र, मोजक्याच कंपन्यांनी प्रचार करून व्यवसाय आकर्षित केला.
बातम्या आणखी आहेत...