आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीत आलेल्या 15 लाख कोटींत काळा पैसा किती? प्रोफेशनल्सच्या मदतीने शोधतेय सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नोटबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेल्या 15 लाख कोटी रुपयांमध्ये किती ब्लॅकमनी आहे, हे जाणण्यासाठी मोदी सरकार आयटी प्रोफेशनल्सची मदत घेत आहे. या आयटी प्रोफेशनल्सनेच नोंटबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये झालेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती समोर आणली होती. नंतर इन्कम टॅक्स (आयटी) डिपार्टमेंटने याबाबत कारवाई करत 18 लाखांहून अधिक लोकांना नोटिसा पाठवल्या होत्या. त्यांना खात्यावर झालेल्या व्यवहारांची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. आता अशाच आणखी अनेक लोकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. 


आऊटसोर्सिंगद्वारे काढली जातेय संशयित व्यवहारांची माहिती 
- आय डिपार्टमेंटच्या एखा वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नोटबंदीनंतर बँकांमध्ये 15 लाख कोटी रुपये जमा झाले होते.  
- ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या व्यवहारांची तपासणी करण्यासाठी सरकारकडे तांत्रिक कौशल्य आणि कर्मचारीही नव्हते. त्यामुळे सरकारने आयटी प्रोफेशनल्सच्या मदतीने नोटबंदीनंतर झालेले व्यवहार तपासण्यासाठी एका कंपनीला काम दिले. ही कंपनी तपास करून पुढील कारवाईसाठी प्राप्तीकर विभागाला माहिती पाठवत आहे. 


बेहिशेबी मालमत्तांचा शोध लागणार
- आयटी डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले की, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, आधार बेहिशेबी मालमत्तेविरोधातील लढाईत महत्त्वाचे शस्त्र ठरू शकते. सरकारने प्रॉपर्टी आधारशी जोडण्याचा निर्णय घेतला तर त्याने बेनामी मालमत्ता शोधणे अत्यंत सोपे ठरेल. 
- ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या मदतीने आयटी प्रोफेशनल्स अत्यंत कमी वेळेमध्ये बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्यांचा शोध लावण्यात सरकारची मदत करू शकते. 


रिटर्न न भरणाऱ्यांचीही ओळख पटवली जातेय 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीचे आयटी प्रोफेशनल्स सरकारद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या डाटामधून अशा लोकांचीही माहिती मिळवत आहे, जे टॅक्स रिटर्न फाइल करत नाही. आयटी डिपार्टमेंटला अशी अपेक्षा आहे की, आगामी काळात करदात्यांची संख्या जास्तीत जास्त वाढेल. 


नवीन वर्षात आयटी डिपार्टमेंट करणार कारवाई 
अधिकाऱ्यांच्या मते, आयटी प्रोफेशनल्समुळे आम्ही अत्यंत कमी वेळेत संशयित व्यवहारांची माहिती मिळवून लोकांना नोटिस पाठवण्याची प्रोसेसही पूर्ण केली आहे. नव्या वर्षात अशा लोकांच्या विरोधात कारवाईस सुरुवात होईल. 

 

बातम्या आणखी आहेत...