आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी चांगले रिफॉर्मर नाहीत, GST ला विनाकारण बनवले कठीण : द इकॉनॉमिस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मासिकाने मोदी यांना मनमोहन सिंह यांच्यापेक्षा अधिक कार्यक्षम म्हटले आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
मासिकाने मोदी यांना मनमोहन सिंह यांच्यापेक्षा अधिक कार्यक्षम म्हटले आहे. (संग्रहित फोटो)
मुंबई- नरेंद्र मोदी हे चांगले प्रशासक आहेत पण चांगले रिफॉर्मर नसल्याचे मत ‘द इकॉनॉमिस्‍ट’ने व्यक्त केले आहे. जीएसटीला विनाकारण कठीण करण्यात आल्याचे मासिकाने म्हटले आहे. मोदी यांनी रिफॉर्मरबाबत जे उपाय केले त्या सर्वांबाबत साशंकता आहे, असेही नमूद केले आहे.

जीएसटीत नोकरशाहीचा वरचष्मा
- मासिकाने 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
- जीएसटीला विनाकारण कठीण करण्यात आल्याने व त्यात नोकरशाहीचा वरचष्मा असल्याने जीएसटीची इफिशंनसी घटेल.

नोटबंदीच्या निर्णयावरही केली टीका
- नोव्हेंबर महिन्याच्या अंकात मासिकाने नोटबंदीच्या निर्णयावरही टीका केली होती.
- नोटबंदीच्या निर्णयावर टीका करताना या निर्णयाला काउंटर प्रोडक्टिव निर्णय असे म्हटले आहे. या निर्णयामुळे इमानदारीने व्यवसाय करणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. बेकायदेशीर कामे करणाऱ्याचे या निर्णयाने कोणतेही नुकसान झाले नाही. अर्थव्यवस्थेची गतीही या निर्णयाने मंदावली. या आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यात जीडीपी वाढण्याची गती 6.1 टक्के होती. मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वी जीडीपी यापेक्षा वेगाने वाढत होती.

मोदी मनमोहन सिंह यांच्यापेक्षा अधिक कार्यक्षम
- मोदी हे मनमोहन सिंह यांच्यापेक्षा अधिक कार्यक्षम पंतप्रधान आहेत. मोदींकडे कोणतीही नवी आयडिया मात्र नाही. जीएसटी आणि बॅंककरप्सी कोड हे विषय ते सत्तेवर येण्याच्या खूप आधीपासून आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...