आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Money Ban 9 Thousand Quintals Of Soybean The Amount Of The Interest Rate Of 6 To 75 In Six Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीनेे शेतकऱ्यांनी ९ हजार क्विंटल सोयाबीन ठेवले तारण, सहा महिन्यांसाठी ७५ % रक्कम ६ % व्याजदरान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - केंद्र सरकारने हजार व पाचशे रुपयांच्या नोटांवर घातलेली बंदी आणि बाजारात दरात चढउतार होत असल्याने १२४ शेतकऱ्यांनी जवळपास नऊ हजार क्विंटल सोयाबीन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू केलेल्या शेतमाल तारण योजनेंतर्गत तारण ठेवून गरजेइतकी रक्कम घेतली आहे. शंभर, पन्नास रुपयांचा चलन तुटवडा निर्माण झाल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार कोलमडला होता. त्यात आता काहीअंशी सुधारणा होत आहे. शेतकऱ्यांनी चेकद्वारे आपल्या मालाची रक्कम स्वीकारण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. त्याला सुशिक्षित शेतकरी प्रतिसाद देत आहेत.

मालाची उपलब्धता, साठेबाजी आणि नफेखोरीला आळा घालण्यासाठी सरकारने सोयाबीन साठवणूक मर्यादा घातली होती. पण यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन लक्षात घेऊन १५ दिवसांपूर्वी साठवणूक मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. परिणामी भाव वाढवण्याबरोबरच आवकही वाढली आहे. पूर्वी एका व्यापाऱ्याला २० हजार क्विंटलपर्यंत साठवणूक करता येत होती. आता ती पूर्णपणे खुली करण्यात आली आहे. येथील बाजारात मंगळवारी जवळपास २५ हजार क्विंटलच्या घरात सोयाबीनची आवक झाली होती. त्याला तीन हजारांचा भाव मिळाला. पुढील काळात सोयाबीनच्या दरात आणखी दरवाढ होण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

बाजारात सोयाबीनच्या दरात चढउतार होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांनाही तेजी-मंदीचा फायदा मिळावा म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून त्यादिवशीच्या चालू बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम सहा टक्के व्याजदराने ६ महिन्यांच्या कालावधीकरिता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी लातूर व मुरूड येथे गोडाऊन उघडण्यात आले आहेत.
आधारभूत केंद्रे ओस

शेतकऱ्यांना आधारभूत किमतीनुसार सोयाबीनला भाव मिळावा म्हणून लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर आणि औसा येथे केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु या तिन्ही केंद्रांवर एकही क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली नाही. कारण आधारभूत किंमत २७७५ रुपये प्रतिक्विंटल सरकारने ठरवली आहे. परंतु बाजारात त्यापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे
चेक, डीडीचा पर्याय
^चलन तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीने पणन संचालकाच्या सूचनेनुसार आडत व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. त्यानुसार आर्थिक व्यवहार चेक, डीडी, एनईएफडी, आरटीजीएस, इंटरनेट बँकिंगमार्फत करण्याचे ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चेक स्वीकारून सहकार्य करावे.

-मधुकर गुंजकर, सचिव, कृउबा, लातूर
तीन कोटी वितरणाचे उद्दिष्ट

मंगळवारपर्यंत शेत तारण योजनेअंतर्गत लातूर व मुरूड येथे १२४ शेतकऱ्यांनी ८९२६ हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीकडे तारण ठेवले आहे. त्यासाठी त्यांना एक कोटी ६७ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. येत्या महिनाभरात या योजनेअंतर्गत तीन कोटी रुपयांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट बाजार समितीने ठेवल्याचे बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर
यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...