आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीने वीकएंड सहलींना लागला ब्रेक , विदेशी पर्यटकांची संख्या राेडावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : चलन बदलाचा सर्वाधिक परिणाम राज्यातील पर्यटन व्यवसायावर झाला अाहे. अाॅनलाइन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली नसली तरी नाेव्हेंबर ते डिसेंबर या एेन हंगामातच नाेटाबंदीचा निर्णय झाल्याने वीकएंड सहलींना ब्रेक लागला अाहे. परिणामी छाेट्या ट्रॅव्हल एजंटांना फटका बसून त्यांच्या व्यवसायात ५० ते ८० टक्के घट झाली अाहे.
दिवाळीची सुटी संपल्यानंतर काेकण, महाबळेश्वर, माथेरान, गणपतीपुळे, अष्टविनायक दर्शन यांसारख्या साधारण दाेनशे किलाेमीटर अंतरावरील ठिकाणे वीकएंड सहलीसाठी निवडली जातात. माेटार किंवा बस भाड्याने घेऊन पर्यटक या ठिकाणी जातात. सहलीला गेल्यानंतर हाॅटेलचे भाडे पाच हजार रुपये असेल तर तेवढीच रक्कम खिशात असावी लागते. सहलीला गेल्यानंतर चहा, नाष्टा, खरेदी या गाेष्टींसाठी पुरेशी राेकड जवळ नसल्याने पर्यटकांनी सहली लांबणीवर टाकून घरगुती खर्च व्यवस्थापनाला अधिक प्राधान्य दिल्याने वीकएंड सहलीत जवळपास ५० टक्के घट झाल्याचे पुण्याच्या ट्रॅव्हल एजंट असाेसिएशनचे अध्यक्ष डाॅ. विश्वास केळकर यांनी सांगितले. पैशाच्या चणचणीमुळे सहलीला जाण्याची मानसिकता नाही. नागरिक जवळच्या ५० रुपयांपैकी दहा रुपये खर्च करतानाही काचकुच करत अाहेत. त्यामुळे हंगाम असूनही एकही बुकिंग झाले नसल्याचे व्यावसायिक सुशांत राणे यांनी सांगितले.

विदेशी पर्यटकांची संख्या राेडावली : ट्रॅव्हल्स व्यावसायिक अशाेक कदम म्हणाले, नाेव्हेंबर ते जानेवारीदरम्यान अाैरंगाबादेत विदेशी पर्यटक माेठ्या प्रमाणावर येत असतात. जर्मनीहून दाेन मुली अिजंठा, वेरूळ बघण्यासाठी अाल्या हाेत्या; पण नाेटाबंदीनंतर त्यांना एटीएममधून पुरेसे पैसे मिळाले नाहीत. विदेशी चलन बदलतानादेखील मर्यादा हाेत्या. अखेर त्या कंटाळून काेलंबाेला गेल्या आहेत.
अाॅनलाइन बुकिंग
९०% बुकिंग अाॅनलाइन होत असल्याने माेठ्या हाॅटेलमध्ये पर्यटकांना त्रास झाला नसल्याचे मुंबईतल्या काॅन्सेप्ट हाॅस्पिटॅलिटीच्या अाॅनलाइन रेव्हेन्यू विभागाचे महाव्यवस्थापक प्रकाश बाळ यांनी सांगितले. अॅम्बेसेडर हाॅटेलचे काॅर्पाेरेट उपाध्यक्ष प्रमाेद कुलकर्णी म्हणाले की, पर्यटकांनी खर्च टाळल्यामुळे प्रवासाचे प्रमाण कमी झाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...