आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monthly Income From You Investment In Post Office And Banks

बॅंक किंवा पोस्ट ऑफिसच्या या स्किम्समध्ये करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळेल पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिटायर झाल्यावर बहुतांश लोकांचे नियमित उत्पन्नाचे माध्यम बंद झाले असतात. अशा वेळी दैनंदिन गरजा भागविण्याची मोठी समस्या उभी राहू शकते. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला ठराविक उत्पन्न मिळवून देणाऱ्या स्किम्स बॅंक आणि पोस्ट ऑफिसने लॉंच केल्या आहेत. या शिवाय म्युचल फंड कंपन्याही अशा प्रकारच्या योजना घेऊन आल्या आहेत.
पोस्ट ऑफिसची स्किम
नियमित मासिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्किम (एमआईएस) खाते उघडता येईल. खास करुन रिटायर्ड कर्मचारी/सिनिअर सिटिझन्स यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम आहे, अशा लोकांसाठीही हे खाते योग्य आहे. या खात्याचा मॅच्युरिटी पिरिअड पाच वर्षांचा आहे. या शिवाय बचत खात्यात ऑटो क्रेडिट फॅसिलिटीही दिली जाते. हे खाते जॉईंट स्वरुपातही उघडले जाऊ शकते.
1500 रुपयांमध्ये उघडा खाते
यात सिंगल अकाऊंटसाठी कमीत कमी रक्कम 1500 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये आहे. जॉईंट अकाऊंटमध्ये ही सीमा अनुक्रमे 1500 आणि 9 लाख आहे. ही योजना ऑटोमॅटिक पद्धतीने काम करते. तुम्ही सेव्हिंग बॅंक आकाऊंटवर एमआयएसवर मिळणाऱ्या व्याजावर ऑटोमॅटिक ट्रान्सफरची रिक्वेस्ट देऊ शकता.
प्रत्येक महिन्याला 8.40 टक्के व्याज मिळेल
या रकमेवर सध्या 8.40 टक्केवारीने व्याज दिले जाते. तुम्ही जर सिंगल एमआयएस अकाऊंटमध्ये 4.5 लाख जमा केले तर सध्याच्या व्याजाच्या हिशोबाने प्रत्येक महिन्याला 3,150 रुपये मिळतील. या योजनेतून मिळणारी व्याजाची रक्कम टॅक्सेबल इन्कम म्हणून गृहित धरली जाते.
पुढील स्लाईडवर वाचा... बॅंक आणि म्युचल फंड कंपन्यांच्या या प्रकरणारच्या योजनांबद्दल...
नोट- या बातमीतील फोटो सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.