आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉजिस्टिक्स कंपन्यांना सुलभ अटींवर मिळेल जास्त कर्ज; लॉजिस्टिक्सला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारने वाहतूक (ट्रान्सपोर्ट) तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्राला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा दिला आहे. यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना सामान्य अटींवर जास्त कर्ज मिळणार आहे. या कंपन्या विमा आणि निवृत्तिवेतन संघटनेकडून जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ शकतील. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारा आर्थिक प्रकरणांच्या विभागाने (डीईए)  यासंबंधी एक नोटिफिकेशन जारी केले आहे. या क्षेत्रातील कंपन्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे कंपन्यांच्या खर्चात कमी कमी ०.५ टक्क्यांची बचत होणार असल्याचे म्हटले आहे.  


ट्रान्सपोर्ट तसेच लॉजिस्टक्समध्ये शीतगृह, वेअरहाउस आणि लॉजिस्टिक्स पार्क यांचाही समावेश करण्यात आला आहे. या आधी रस्ते, पूल, बंदर, शिपयार्ड, पाण्यावरील विमानतळ, रेल्वे रुळ, बोगदा यांचा यामध्ये समावेश होता. ऊर्जा, पाणी तसेच स्वच्छता, दूरसंचार, सामाजिक तसेच व्यावसायिक इन्फ्रास्ट्रक्चरला आधीच हा दर्जा मिळालेला आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतात या क्षेत्रातील खर्च खूपच जास्त असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामुळे भारतातील उत्पादने इतर देशात महाग ठरत असून त्याचा निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे. यात सुधारणा झाल्यास उत्पादन आणि नवीन रोजगार दोन्हींना प्रोत्साहन मिळेल.

बातम्या आणखी आहेत...