आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसाला दहा हजारांपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार आता करपात्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रोख व्यवहारासाठी मोदी सरकारने व्यवसायाचे नियम अधिक कडक केले आहेत. वित्त विधेयकानुसार, एका दिवसात जर १० हजारांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार रोख करण्यात आला तर त्याला व्यावसायिकाचे उत्पन्न मानले जाईल. म्हणजेच ती रक्कम करपात्र समजली जाईल.   

या रकमेला व्यवसायिक खर्चात समाविष्ट केले जाणार नाही. आतापर्यंत ही मर्यादा २० हजारांची होती. १ एप्रिल २०१७ पासून नवीन नियम लागू होतील. यासंदर्भात बोलताना चार्टर्ड अकाउंटंट अतुल गर्ग म्हणाले की, आयकर कायदा कलम ४० ए मधील दुरुस्ती प्रस्तावानुसार, कुठलाही व्यावसायिक एका दिवसात १० हजार रुपयाहून अधिक रकमेचे व्यवहार रोखीने करू शकणार नाही. जर त्याने असे केले तर ती रक्कम उत्पन्न मानण्यात येईल. अशा पद्धतीचे व्यवहार आता चेकने करावे लागणार आहेत. या निर्णयाचा व्यावसायिक, डॉक्टर, वकिलांवर याचा परिणाम पडणार आहे. कारण आतापर्यंत ते सर्व व्यवहार रोख पद्धतीने करत होते.   

व्यवसायावर परिणाम होणार   
आयएमएसएमई आॅफ इंडियाचे चेअरमन राजीव चावला म्हणाले की, १० हजारांची मर्यादा खूप कमी आहे. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर पडणार आहे. वाहतुकीपासून इतर लहान लहान व्यवहार आम्हाला चेकने करावे लागणार आहेत. लहान रक्कम चेकच्या माध्यमातून घेण्यासाठी छोटे व्यावसायिक तयार नसतात. त्यामुळे याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...