आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदर्स डेअरीची राज्यात २०० काेटींची गुंतवणूक, मराठवाडा, विदर्भातून करणार दूध खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची उपकंपनी असलेल्या मदर डेअरीने महाराष्ट्रात २०० काेटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला अाहे. मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याबरोबरच नागपूर येथील दूध प्रकल्पाचे नूतनीकरण अाणि भिवंडी येथे नवीन प्रकल्प उभारण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार अाहे.

मराठवाडा, विदर्भातील दुष्काळामुळे महाराष्ट्र सरकारला चिंता निर्माण झाली अाहे. या दुष्काळावर मात करण्याबरोबरच विविध प्रकारच्या उपाययाेजनांच्या माध्यमातून या भागांचा विकास करण्याबरोबरच त्यांना एक उत्पन्नाचे साधन मिळवून देण्याचा सरकारचा विचार अाहे. त्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय दुग्धविकास संघटनेबरोबर अलीकडेच परस्पर सामंजस्य करार केला.या कराराचा एक भाग म्हणून मराठवाडा अाणि विदर्भात २०० काेटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याचे मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रा.िल.चे व्यवस्थापकीय संचालक एस. नागराजन यांनी सांगितले. मुंबईत एका दुग्ध उत्पादनाच्या अनावरणप्रसंगी ते बाेलत हाेते.

डेअरीचा विकास करण्यासाठी सध्या विदर्भ अाणि मराठवाड्याची निवड केली अाहे. त्यानुसार या दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यात येईल. नागपूर येथील शासकीय दूध डेअरी राज्य सरकारने मदर डेअरीला हस्तांतरित केला अाहे. नागपूरमधील दूध डेअरीचे नूतनीकरण करून दूध प्रक्रिया सुविधा सुरू करण्यात येणार अाहे. ही सुविधा पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित हाेण्याचा अंदाज नागराजन यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यातल्या ५० गावांतून खरेदी
मराठवाड्यातल्या ५० गावांतील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येणार अाहे. पुढील तीन वर्षांत दूध खरेदीसाठी दोन्ही भागांतील गावांची संख्या दाेन हजारांपर्यंत विस्तारण्यात येणार अाहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे दूध अाणि दूध उत्पादनांच्या निर्मितीसाठी १६० काेटी रुपये खर्च करून नवीन प्रकल्प उभारण्यात येणार अाहे. या प्रकल्पाची सध्या दररोज तीन लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असेल, असेही नागराजन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...