आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल असो वा बाईक, भारतात पहिल्या क्रमांकावर आहे ही कंपनी, आता मिळाला नवीन \'हीरो\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सायकल असो वा बाईक, हीरो मोटोकॉर्प कंपनीने त्यांच्या प्रत्येक सेग्मेंटमध्ये धुमाकूळ घातला. 1984 मध्ये सुरू झालेल्या या हीरो मोटोकॉर्पचे तेव्हापासून आतापर्यंत निव्वळ मुल्य (नेटवर्थ) 5599 कोटीचा आकडा पार करून गेले आहे. अनेक चढ उतार आले मात्र कंपनीची घोडदौड सुरू होती. आतापर्यंत या कंपनीच्या विकासात अनेकांनी आपला घाम गाळला आहे. आता या कंपनीला नवा हीरो मिळाला आहे. या कंपनीच्या स्थापनेपासून तिचे चेअरमन आणि प्रबंध निदेशक असलेले 92 वर्षीय बृजमोहन लाल मुंजाळ यांनी आता कंपनीचा सर्व कारभार त्यांचा मुलगा पवन मुंजाल यांना स्वाधीन केला आहे. त्यांनी कार्यकारी चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र बृजमोहन मुंजाल तरीही सर्व कामकाजावर नजर ठेऊन असणार आहेत.

बृजमोहन लाल आहेत भारतील 38 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती
हीरो समुहाचे चेअरमन बृजमोहन लाल मुंजाल यांनी अपार कष्टाने आणि त्यांच्या दूरदृष्टीकोनाने ते करून दाखवले, ज्याचे लोक स्वप्नच पाहातात. मुंजाल यांच्या कठीण परिश्रमामुळे त्यांच्या टू-व्हिलर कंपनीलसा जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनवले आहे. सप्टेंबर 2014 मध्ये जाहीर झालेल्या फोर्ब्स यादीनुसार मुंजाळ यांच्याजवळ एकूण 23310 कोटी रुपयांची संपत्ती आहे.. ते भारतातील 38वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कसा सुरू झाला कंपनीचा प्रवास