आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mr.Pawan Munjal Being Appointed As The New Chairman Of Hero MotoCorp

सायकल असो वा बाइक, No.1 कंपनी, आता मिळाला नवा \'हीरो\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायकल असो अथवा बाइक, हीरो मोटोकॉर्प कंपनीने त्यांच्या प्रत्येक सेग्मेंटमध्ये धुमाकूळ घातला. ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी 1984 मध्ये सुरू केलेल्या हीरो मोटोकॉर्पने 5599 कोटींचा बिझनेस केले आहे.

ब्रिजमोहनलाल मुंजाल यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मुंजाल यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले मात्र, त्या परिस्थितीतही त्यांनी कंपनीची घोडदौड सुरू ठेवली. कंपनीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आता ही कंपनी 'हीरो' या नावाने ओळखली जाते.

कंपनीचे संस्थापक ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी आता कंपनीचा सर्व कारभार त्यांचा मुलगा पवन मुंजाल यांच्याकडे सोपवला आहे.

ब्रिजमोहनलाल होते देशातील 38 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती
हीरो समुहाचे चेअरमन ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी अपार कष्टाने आणि त्यांच्या दुरदृष्टीने कंपनी उभी केली. मुंजाल यांची कंपनी आज टू-व्हिलरचा जगातील पहिल्या क्रमांकाची ब्रँड बनली आहे. फोर्ब्स इंडियाने 2014 मध्ये जाहीर केलेल्या यादीनुसार मुंजाळ यांच्याकडे 23310 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ते देशातील 38 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

पुढील स्लाइडवर वाचा, 'हीरो'चा प्रवास...