आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एमएसएमई' मंचातर्फे २८ ऑगस्टला एक्स्पो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : लघु व मध्यम उद्योग विकास मंच (एसएसएमई) लघु, छोट्या आणि मध्यम उपक्रमांसाठी एक्स्पोचे आयोजन करणार आहे. हा एक्स्पो २८ ते ३० ऑगस्टपर्यंत दिल्लीतील प्रगती मैदानात होणार आहे. एसएसएमई क्षेत्राला मोठ्या कंपन्यांशी जोडणे, त्यांच्या बरोबरीत संधी उपलब्ध करून देणे आणि विकासासाठी नव्या बाजारपेठेचा शोध घेणे असा यामागचा उद्देश आहे.

एक्स्पोमध्ये उद्योजकांना बँकांकडून कर्जाची मंजुरी, सरकारी कंपन्यांच्या (पीएसयू) व्हेंडर म्हणून नोंदणी, बिझनेस टू बिझनेस मीटिंग आणि नव्याने सुरू होणाऱ्या कंपन्यांना भांडवलसारख्या सुविधा मिळणार आहेत.
एमएसएमईसह दहापेक्षा जास्त मंत्रालये या आयोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत. एप्रिल २०१५ पासून सर्व पीएसयू आणि सरकारी संघटना यांना २० टक्के खरेदी लघु उद्योजकांकडून करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळेच या एक्स्पोमध्ये अनेक मोठ्या सरकारी कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

कृषीनंतर सर्वात जास्त रोजगार लघु उद्योग क्षेत्रातच मिळत आहे. आर्थिक विकास दर १० टक्क्यांपर्यंत जाण्यासाठी हे क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते. वास्तविक पाहता अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे योगदान देऊनही एमएसएमई क्षेत्राला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. उद्योजकांना बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...