आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त कर्ज देणाऱ्या मुद्रा बँकेचा आराखडा तयार, ५ कोटींपेक्षा जास्त व्यावसायिकांना लाभ मिळण्याची आशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लघु उद्योजकांना कर्ज देण्यासाठी मुद्रा बँकेची निर्मिती करण्यात आली असून या माध्यमातून स्वस्त कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी बँकेचा पूर्ण आराखडा तयार झाला असून देशभरातील ५ कोटींपेक्षा जास्त व्यावसायिकांना याचा लाभ मिळण्याची आशा आहे. अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुद्रा बँक कोणत्या पद्धतीने काम करेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

या अंतर्गंत बँक १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. यात ६० टक्के कर्जे ५० हजार रुपयांपर्यंत असतील. याव्यतिरिक्त कर्ज खासगी कंपन्या, मायक्रोफायनान्स संस्था, सोसायटी, असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या अस्तित्वात असलेल्या व्याजदरापेक्षा स्वस्तात हे कर्ज उपलब्ध होणार आहे. लघु उद्योगासाठी १.५ ते २.० टक्के स्वस्त कर्ज उपलब्ध होण्यासाठी हळूहळू या माध्यमातून व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे.

मुद्रा बँक छोट्या-मोठ्या गावांत पोहोचण्यासाठी संस्था, सोसायटीसोबत बँकेला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी संस्था आणि सोसायटीला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. मायक्रोफायनान्स संस्थादेखील मुद्रा बँकेला जोडल्या जातील. या माध्यमातून कर्ज घेणार्‍या प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

कर्ज फेडणे असेल सोपे
अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कर्ज घेणाया व्यक्तीला कर्ज फेडताना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.

ग्राहकांची संपूर्ण माहिती जमा करण्यासाठी मुद्रा बँकेजवळ स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. त्यामुळे नियम सोपे करण्यासाठी आरबीआयसोबत चर्चा सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. यात ईएमआयचा कालावधी कमी करण्यासाठी कर्जदार प्रत्येक १५ दिवसांनंतर ईएमआयचा भरणा करू शकणार आहे. मुद्रा बँकेसाठी सरकार लवकरच कायदा बनवण्याच्या तयारीत आहे.
राज्यांच्या वतीने प्रयत्न
स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मुद्रा बँक मदत करणार आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्य सरकारांच्या वतीनेदेखील अधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मध्य प्रदेश सरकारने इंदूरच्या आयटी पार्कमध्ये "स्टार्टअप व्हिलेज' स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान सरकारने विशेष योजना आखल्या आहेत.
कोणाला मिळेल कर्ज
मुद्रा बँक ६० टक्के कर्ज ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्याला देणार आहे. त्यामुळे छोटे विक्रेते, दुकानदार, मशीन ऑपरेटर, कारागीर, अन्न प्रक्रिया या व्यक्तींना कर्ज मिळणार आहे. छोट्या व्यावसासिकांनी मोठ्या बँकेकडे कर्ज घेण्यासाठी जाणे टाळावे, असे सरकारचे प्रयत्न आहेत.