आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी बनले आशियात सर्वात श्रीमंत; जागतिक श्रीमंतांमध्ये 14 व्या क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्जनुसार बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये आलेल्या १.२२ टक्क्यांच्या तेजीमुळे अंबानींची रिअल टाइम नेटवर्थ २.७३ लाख कोटी रुपये झाली आहे. आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर राहिलेले चीनचे हुइ का-यान २.६३ लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थसह दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. फोर्ब्जच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत अंबानी १४ व्या क्रमांकावर आहेत.  

रिलायन्स इंडस्ट्रीजदेखील सहा लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप असलेली देशातील पहिली कंपनी बनली आहे. बुधवारी शेअर बाजार बंद झाला त्यानंतर या कंपनीचा मार्केट कॅप ६,०३,०९८ लाख कोटी रुपये होता. या अाधीदेखील २४ आॅक्टोबर रोजी रिलायन्सचा मार्केट कॅप सहा लाख कोटी रुपयांवर गेला होता. मात्र, थोड्याच वेळाने खालीदेखील आला होता. रिलायन्सनंतर टॉप-पाच कंपन्यांमध्ये टीसीएसचा मार्केट कॅप ४.९८ लाख कोटी, एचडीएफसी बँकेचा ४.७० लाख कोटी, आयटीसीचा ३.२८ लाख कोटी आणि एचडीएफसीचा २.७९ लाख कोटी रुपये आहे.  

सेन्सेक्समध्येही ३८७ अंकांची तेजी राहिली. यामुळे शेअर बाजारात  नोंदणीकृत सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.०८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा मार्केट कॅप १४५ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० पैकी १६ कंपन्यांमध्ये तेजी नोंदवण्यात आली. क्षेत्रीय दृष्टीने पाहिल्यास बँकिंग, रिअॅल्टी अाणि धातू क्षेत्रातील शेअरमध्ये सर्वाधिक तेजी राहिली.
बातम्या आणखी आहेत...