आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio: 4 महिने फ्री 4G डेटा, 50 रुपयांत 1GB, Life Time मोफत कॉलिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंंबई- रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी समूहाची टेलिकॉम कंपनी जिओच्या लाँचिंगची घोषणा केली. ५ सप्टेंबरला याचा औपचारिक प्रारंभ होईल. यात पुढील ४ महिने, ३१ डिसेंबरपर्यंत मोफत सेवा मिळेल. जानेवारीपासून केवळ डाटाचे बिल येईल. रोमिंगसह सर्व व्हाॅइस कॉल कायम मोफत असतील. डाटा प्लॅन ५० रु./ जीबीपासून सुरू होईल.
भारत आता टेलिकॉम क्षेत्रात टॉप-१० देशांत दाखल होईल, असा दावा अंबानी यांनी सर्वसाधारण सभेत केला. दरम्यान, जिओ दाखल होताच टेलिकॉम कंपन्यांत डाटा युद्ध छेडले गेले. यामुळे एअरटेल, आयडिया व व्होडाफाेनने दरकपातीची तयारी केली आहे.

एअरटेल, आयडियाचे मार्केट कॅप १६,९९७ कोटींनी घटला : या घोषणेनंतर एअरटेल, आयडिया व रिलायन्स कम्युनिकेशनचे शेअर ११ टक्के कोसळले. त्यांचे बाजार भांडवल मूल्य १६,९९७ कोटींनी घटले आहे. मुकेश यांच्या कंपनीचे शेअरही ३ टक्क्यांनी कोसळले.

जिओच्या ४ मोठ्या घोषणा
- विद्यार्थ्यांना समान दराने २५ % अधिक डाटा मिळेल. त्यासाठी आयकार्ड आवश्यक.
- दिवाळीसारख्या सणात फ्री मेसेज ब्लॅकआऊट होणार नाही. तसेच दरही वाढवले जाणार नाहीत.
- जगात सर्वात स्वस्त दर असल्याचा दावा. १ जीबी डाटा केवळ ५० रुपयांत.
- २८ दिवसांसाठी ४-जी शुल्क १४९ रुपयांपासून सुरू. ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४ जीबी ४-जी डाटा. ५ हजारांत ७५ जीबी डाटा मिळणार.

१३ वर्षांपूर्वी-‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ नारा, देशात मोबाइल क्रांती झाली
रिलायन्सनेच ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ नारा देत २००३ मध्ये ५०१ रु.च्या हँडसेटसह कनेक्शन फ्री दिले. कॉलरेटही १५ पैसे प्रतिमिनिट ठेवला. इतरांचा होता २ रुपये. यामुळे घरोघरी मोबाइल आले.

आता म्हणाले-आजवर गांधीगिरी केली, आता डाटागिरी करू शकू
मुकेश अंबानी म्हणाले, ५ सप्टेंबरपासून देशात डाटा क्रांती येईल. आपण भारतीय आजवर गांधीगिरी करत होतो. आता डाटागिरी करू शकू. सध्या १८ हजार शहरे व २ लाख गावांत जिओचे नेटवर्क आहे.

देशभरात 10 लाख WiFi झोन बनवणार जिओ...
- जगातील सर्वात स्वस्त 4जी स्मार्ट प्लान लॉन्च केल्याचा दावा ‍‍मुकेश अंंबानी यांनी केला आहे.
- जिओचा डाटा प्लान टॅरिफ 50 रुपये/1GB पासून सुुरु होणार आहे.
- देशभरात 10 लाख WiFi झोन बनवले जाणार आहेत.
- या झोनशी शाळा/महाविद्यालयाना जोडण्यात येणार आहे.
- व्हाइस कॉलिंग सेवा मोफत मिळेेल.

असे मिळवा Reliance Jio 4G सिम
- गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करावं.
- त्यानंतर get jio sim>agree>get jio offer>location>next button>
- ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरला व्हिजिट द्यावी.

पुढील स्लाइडवर वाचा, मुकेश अंंबानींंची घोषणा... रिलायन्स Jio रोडमॅप...Reliance Jio 4G Sim खरेदी करताय? मग जाणून घ्या, या 10 आवश्यक बाबी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...