आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Airport Authority Auctions Vijay Mallyas Jet For 22 Lakh Rupees News In Marathi

विजय माल्ल्यांच्या \'पर्सनल जेट\'चे झाले तुकडे, 22 लाखांत विकले गेले भंगारात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मद्यसम्राट विजय माल्ल्यांच्या वैभवाचे प्रतिक मानले जाणारे 11 सीटर जेट भंगारात काढण्यात आले आहे. किंगफिशर एअरलाइन्स कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर आपली थकबाकी वसूल करण्यासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने (एमआयएएल) माल्ल्यांचे पर्सनल जेट 22 लाख रुपयांत एका कंपनीला विकले.

माल्ल्यांचे विमान मुंबईतील उपनगरीय कुर्ल्यातील सायलेंट एंटरप्रायजेसने खरेदी केले आहे. माल्ल्यांच्या जेटचे तुकडे-तुकडे करून भंगारात विकून या कंपनीला चांगला नफा कमवायचा आहे. जेटच्या तोडफोडीसाठी कंपनीने सहा कामगारांची नियुक्ती केली आहे. 6 एप्रिलपासून जेटची तोडफोडीचे काम सुरु आहे.

सायलेंट एंटरप्रायजेसच्या सुपरवायझरने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, विमानाचे इंजिन तोडण्याचे काम सुरु आहे. विमानाच्या इंजिनाचा भाग फारच गुंतागुंतीचा असतो. हे काम फारच कठीण आहे. या विमानातून तब्बल 6.5 टन स्क्रॅप मेटल मिळण्याची अपेक्षा आहे. जेटची तोडफोड झाल्यानंतर स्क्रॅप मेटल कुर्ल्यातील खैरानी भागातील कंपनीच्या गोडाउनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, विजय माल्ल्यांनी 11 सीटर जेट 30 वर्षांपूर्वी ओबेरॉय ग्रुपकडून खरेदी केले होते. या विमानाचे वजन 11 हजार 590 किलो आहे. किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यानंतर एमआयएएलची 53 कोटी रुपये थकले होते. माल्ल्यांच्या पर्सनल जेटसह 7 विमाने एमआयएएलने जप्त केले होते. एमआयएलने डिसेंबर 2014 मध्ये या जेटचा लिलाव करण्‍यात आला. त्यात सायलेंट एंटरप्रायजेसने 22 लाख रुपयांत जेट खरेदी केले.