आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा एकदेखील सरकारी प्रकल्प मिळाला नाही, ज्यात फायदा झाला : नारायण मूर्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि माजी अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, इन्फोसिसला असा एकदेखील सरकारी प्रकल्प मिळाला नाही, ज्यामुळे कंपनीला फायदा झाला असेल. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले आहे. त्यांचे विचार त्यांच्याच शब्दांत...

"इन्फोसिसला आजपर्यंत एकदेखील असा सरकारी प्रकल्प मिळाला नाही ज्यात कंपनीला नुकसान झाले नसेल. सरकारसोबत काम करण्याचे हेच सत्य आहे. ही फक्त इन्फोसिसची समस्या नाही, तर सरकारी प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व आयटी कंपन्यांना लालफीतशाही, कमी किंमत, पैसे मिळायला उशीर, वेळेवर सॉफ्टवेअर न घेणे अाणि प्रकल्पात बदलासोबतच भ्रष्टाचारासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर या समस्या नसतील तर डिजिटल इंडियामध्ये काम करण्यासाठी देशातील आयटी कंपन्यांच्या रांगा लागतील.

भारतीय कंपन्या आपल्या उत्पन्नातील ९० ते ९८ टक्के नफा हा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून मिळवतात. भारताच्या बाहेर त्यांना कामाची योग्य किंमत मिळते. सरकार जोपर्यंत कामाची योग्य आणि तुलनात्मक मांडणी करत नाही तोपर्यंत कोणतीच मोठी कंपनी सरकारसोबत काम करण्यास तयार हाेणार नाही, असे मला वाटते. सरकारने कंत्राटदार आणि सरकार या दोघांना फायदेशीर ठरतील अशा अटी ठेवल्या पाहिजेत. तसेच प्रकल्प वेळेवर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे निश्चित करणे आवश्यक आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्यासाठी योग्य वेळ द्यावा. तसेच कंपन्यांना अनावश्यक दंड भरावा लागू नये. डिजिटल इंडिया अभियान सफल बनवण्यासाठी आधी सरकारसोबत काम करणे अधिक सुलभ होणे आवश्यक अाहे. सरकारी प्रकल्पाचे नियम आंतरराष्ट्रीय पातळीप्रमाणे असले पाहिजेत. कंपन्यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर वेळेवर घेतले आणि त्यांचे पैस वेळेवर दिले गेले पाहिजेत.'
बातम्या आणखी आहेत...