नवी दिल्ली- पैसा कमावणे सोपी गोष्ट नाही. हे आपल्याला माहीत आहेच म्हणा. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, तुम्हाला हे कदाचित माहीत नसावे की, झोपण्याच्या बदल्यात 12 लाख रुपये मिळतात. आम्ही चर्चा करत आहोत अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ची. 'नासा'ने सिरीज ‘बेड रेस्ट स्टडीज’साठी व्हॉलेंटियर्सकडून अर्ज मागवण्यात आले आहे. व्हॉलेंटियर्सला 70 दिवस बेडवर वेगवेगळ्या पद्धतीत झोपावे लागते.
कशी मिळते 12.25 लाख रुपयांची रक्कम...?'नासा'च्या अंतराळ प्रवाशांना मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये दीर्घकाळ राहावे लागते. हे काम अत्यंत कठीण असते. 'नासा' याद्वारे अंतराळात प्रवाशांवर होणार्या परिणामांचा अभ्यास करत असते. या संशोधनासाठी 'नासा' आपल्या व्हॉलेंटियर्सला 12 लाख रुपये मानधन देते. बेड रेस्ट, बेड रेस्ट स्टडीज व इतर दुसर्या नावांनी 'नासा' वर्षानुवर्षे असे संशोधन करत आले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 लाखांसाठी अंतराळात घालवावे लागतात 70 दिवस...