आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांच्या खंडानंतर नाशिकचा कांदा युरोपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या चवीने आशिया खंडातील देशांना पूर्वीच भुरळ घातली आहे; परंतु आता पुन्हा युरोपातील नागरिकांना भुरळ घालण्यास तयार झाला आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर नाशिकचा कांदा युरोपातील बाजारात विक्रीला दिसणार आहे. त्यामुळे निर्यातक्षम कांद्याची मागणी वाढणार आहे; परंतु यंदा कांद्याचे अधिक उत्पादन असल्याने केंद्र सरकार साडेआठ ते साडेनऊ रुपये किलो दराने कांदा खरेदी करणार आहे. तसेच भविष्यात तोच कांदा दरवाढ झाली तर बाहेर विक्रीसाठी काढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांद्याची अाशिया खंडातील देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वर्षी परदेशातील बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याने पाकिस्तानच्या कांद्यावर मात करत पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पाकिस्तानपेक्षा भारतीय कांद्याचे दर प्रति टनामागे ५० डाॅलरने कमी असल्याने मागणी वाढली आहे. तसेच यंदा युरोपातील इंग्लंड, रशिया, स्वित्झर्लंड, हाॅलंड या देशांमध्ये कांदा निर्यात होणार आहे. सध्या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची अधिक आवक असल्याने तसेच देशातील निम्म्या राज्यामध्ये स्थानिक कांदा उत्पादन सुरू असल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे सध्या प्रति क्विंटल ६०० ते ८०० रुपयेदरम्यान दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली असल्याने पुढील दोन ते तीन महिन्यांत तो कांदा बाजारात विक्रीला येण्याची शक्यता राहणार आहे. सध्या बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका, इजिप्त आणि चीनमध्ये कांद्याची निर्यात होत असून त्याचप्रमाणे रशिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड, हाॅलंड या देशांमध्ये कांदा निर्यात होणार असल्याने दर वाढण्याची आशा कांदा उत्पादकांना आहे.

हाॅलंडला निर्यात
या वर्षापासून नव्या देशांमध्ये कांदा निर्यात होणार असल्याने निर्यातक्षम दर्जाच्या कांद्याला मागणी वाढेल. हाॅलंडमध्ये प्रथमच नाशिकचा कांदा निर्यात होत आहे. - विकास सिंग, कांदा निर्यातदार
बातम्या आणखी आहेत...