आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंच्युरी मॅट्रेस कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सेंच्युरी मॅट्रेसची निर्मिती करणाऱ्या सेंच्युरी फायबर प्लेट्स प्रा. लिमिटेड कंपनीला नुकताच निर्यातीबाबतचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. रबरयुक्त काथ्याच्या चटयांची सर्वाधिक निर्यात या क्षेत्रात सेंच्युरीला गौरवण्यात आले. लुधियाना येथे १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सेंच्युरीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुरुषोत्तम मालानी यांना हा पुरस्कार देण्यात आला.

युरोप आणि अशिया खंडात २०१४ आणि २०१५ या काळात सेंच्युरीने रबरयुक्त काथ्याच्या चटयांची (रबराइज्ड कॉयर मॅट्रेस) सर्वाधिक निर्यात केली, त्यामुळे हा राष्ट्रीय पुरस्कार कंपनीला मिळाला आहे. नारळाच्या काथ्या आणि नैसर्गिक रबर यांच्यापासून पर्यावरणपूरक चटयानिर्मिती क्षेत्रात १९८८ पासून संेच्युरी कार्यरत आहे.

गेल्या २५ वर्षांपासून अस्सल भारतीय उत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात असलेल्या सेंच्युरीच्या उत्पादनांना जगभरातून चांगली मागणी आहे. देशाच्या निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना केंद्र सरकारकडून हा पुरस्कार देण्यात येतो, असे सेंच्युरीने पत्रकात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...