आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2020 पर्यंत असेल 2 कोटी अॅप डेव्हलपरची गरज, मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात स्मार्टफोन यूजरची वाढत्या संख्येने विभिन्न प्रकारच्या मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग वाढला शॉपिंगपासून ते ऑनलाइन पेमेंट, रिचार्ज करणे, गेम खेळण्यापर्यंत मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग होत आहे. हेच कारण आहे की, गेल्या काही वर्षांत याच्या बाजारात वेगाने वाढ झाली आहे. यामुळे मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत.   

मोबाइल अॅप हा एका प्रकारचा सॉफ्टवेअरच असतो, जो खास मोबाइलसाठीच बनविला जातो. हे अॅप्लिकेशन कॉम्प्युटर सॉफ्टवेअरपेक्षा कमी आकाराचा असतो. मोबाइल अॅप्लिकेशनचा बाजार फक्त साधारण युजरपर्यंतच केवळ नाहीये तर, व्यापारी व संस्था प्रतिष्ठानेदेखील याचा उपयोग करतात. देशात स्मार्टफोन युजर आणि इंटरनेट ग्राहकांच्या वाढत्या संख्येने या उद्योगात रोजगाराच्या नव्या शक्यता निर्माण झाल्यात. आयएएमएआयच्या अनुसार २०२०च्या शेवटापर्यंत देशात २ कोटी अॅप्लिकेशन डेव्हलपर्सची आवश्यकता असेल. अशात युवकांसाठी हे रोजगाराचे माध्यम बनू शकते आहे.  

चौथी सर्वात मोठी अॅप इकॉनॉमी  
एका अहवालानुसार भारत जगातील चौथी सर्वात मोठी मोबाइल अॅप इकॉनॉमी आहे. याशिवाय भारतीय लोकांद्वारे मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग करण्याचा काळही पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा खूप अधिक झाला आहे. जेव्हा अॅप डाउनलोड करण्याची गोष्ट आली तेव्हा अमेरिका, चीन आणि ब्राझीलनंतर भारतातच सर्वाधिक अॅप डाउनलोड केले जात आहेत. एका अनुमानानुसार देशात अॅप डाउनलोडची संख्या २०२० च्या अखेरपर्यंत जवळपास २० अब्ज असेल. अशातील काही वर्षात भारतात रिटेल अॅपमध्ये खर्च जवळपास ११.५ टक्के वाढला आहे. तथापि या दरम्यान व्हिडिअाे स्ट्रीम अॅपची संख्या ७.४ पटीने वाढली आहे.  

वर्तमानात टीव्ही चॅनेलपासून ते मॅच स्ट्रीम आणि न्यूज पर्यंतसाठी मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग वाढला आहे. कार नेव्हिगेशन, एंटरटेनमेंट, शॉपिंग, कॉमर्स आणि बंॅकिंगसाठी मोबाइल अॅप्लिकेशन लोकांची गरज झाली आहे. विभिन्न स्मार्टफोन कंपन्यादेखील नव्या प्रकारचे अॅप बनविण्यावर जोर देत आहेत. आणि यामुळे याचा बाजारही वेगाने  वाढतो आहे. तथापि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सातत्याने बदलाच्या गोष्टींचा उपयोग करण्याच्या पद्धतीही बदलत राहतात. यासाठी मोबाइल अॅप डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना उद्योगाची मागणी आणि ट्रेंड (प्रवाह) च्या अनुसार स्वत:ला सातत्याने अपडेट करत राहावे लागते. हे अॅप बहुतांश अंॅड्रॉइड वा आयओएस ऑपरेटिंग सिस्टिममध्ये उपयोगात आणले जातात. काही इतर ऑपरेटिंग सिस्टिमसाठीदेखील अॅप बनविले जातात. याशिवाय मोबाइल वेब आधारित अॅपदेखील बनविले जाताहेत, ज्यात एचटीएमएल ५ चा उपयोग केला जातो आहे. आणि यासाठी ब्राउजर ची गरज असते.  

प्रोग्रामिंग लॅग्वेंजची माहिती  
अॅप डेव्हलपर होण्यासाठी सी सी प्लस प्लस, ऑब्जेक्टिव्ह सी प्रोग्रामिंग लंॅग्वेजची माहिती गरजेची आहे. यासह अॅप्लिकेशन डिझाइन, डेव्हलपमेंट अंॅड टेस्टिंगची समजही हवी. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी संगणक विज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. बारावीत गणित हा एक विषय असावा. संगणक विज्ञानामधून पदवी वा पदव्युत्तर पदवी करणारे विद्यार्थी यातीलच पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.  

विविध पदांवर संधी   
या क्षेत्रात व्यावसायिक मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर, अंॅड्रॉइड अॅप्लिकेशन डेव्हलपर, आयफोन, आयओएस अॅप्लिकेशन डेव्हलपर, विंडो मोबाइल अॅप डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनियर, जावा अॅप्लिकेशन डेव्हलपर, ऑब्जेक्टिव्ह-सी डेव्हलपर आणि डॉट नेट डेव्हलपरसारख्या पदांसाठी उपलब्ध आहेत.  

प्रारंभीदेखील चांगले पॅकेज  
यात संस्था आणि योग्यतेच्या आधारावर सॅलरी पॅकेज वेगवेगळे असू शकते. फ्रेशरला वार्षिक पॅकेज ३ ते ४ लाख रुपये मिळू शकते. ५ वर्षांच्या अनुभवानंतर ६ ते ८ लाख वार्षिक पॅकेज मिळण्याची शक्यता असते.  
 
 
बातम्या आणखी आहेत...