आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानी नेसतात 40 लाखांची साडी, मुलांना द्यायच्या फक्त 5 रुपये पाकिटमनी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी व बिझनेसवुमन नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. नीता दररोज सोन्याच्या कपात चहा पितात. इतकेच नव्हे तर त्या 40 लाखांची डिझायनर साडी नेसतात. त्यांच्या हातात सुमारे दीड कोटी रुपयांची बॅग असते.

नीता यांच्या वाढदिवसानिर्मित आम्ही सुरू केलेल्या मालिकेत नीता अंबानींसह त्यांच्या कुटुंबाशी संबंधित खास माहिती घेवून आलो आहोत. नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपचे सीईओ पीरामल नाथवानी यांच्या मुलाच्या विवाह समारंभात 40 लाख रुपयांची डिझायनर साडी नेसली होती. उल्लेखनिय म्हणजे या साडीला 'गिनीज रिकार्ड बुक'मध्ये स्थान मिळाले.

चेन्नईमधील कांचीपुरमच्या 36 महिला कारागिरांनी या साडीची नि‍र्मिती केली होती. ही साडी बनवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला होता. या साडीचे वजन आठ किलो आहे.

मुलांना पाकिटमनी फक्त पाच रुपये...
एका इंटरव्ह्यूमध्ये नीता अंबानी यांनी सांगितले होते की, मुले शाळेत जायचे तेव्हा आठवड्याच्या शुक्रवारी पाच रुपये देत होत्या. मुले ते पाच रुपये स्कूल कॅन्टीनमध्ये खर्च करत होत्या. एके दिवशी धाकटा मुलगा अनंतने 10 रुपयांची मागणी केली होती. त्याला कारण विचारले असता, अनंत म्हणाला होता. पाच रुपयांचे नाणे पाहून शाळेतील इतर मुले त्याला म्हणायची ‘तू अंबानी आहे की भिकारी’.

याशिवाय, नीता यांना घरकामाची खूप आवड आहे. घरात खर्च किती व कसा करायचा, याचे उत्तम व्यवस्थापन त्या करतात. सासू कोकिलाबेन अंबानी यांच्याकडून त्यांनी हे सगळं समजून घेतले आहे. त्याचप्रमाणे मुलांवर देखील त्यांनी उत्तम संस्कार केले आहेत.

नीता अंबानी के ब्रांड्स का कलेक्शन
नीता अंबानी यांच्याकडे बॅग्सचे अनोखे कलेक्शन आहे. त्याचप्रमाणे साड्याविषयी तर विचारायलाच नको. लाखों रुपयांच्या साड्या आजही त्यांच्या अलमारीत आहेत. ज्वेलरीसह त्यांच्या बॅग्सवरही हिर्‍याची नक्षी आहे. जगातील सर्वात महागडे ब्रॅंड्‍सचे नीता यांच्याकडे कलेक्शन आहे. त्यात सॅन्डल, वॉच व गॉगल्सचा समावेश आहे.

पुढील स्लाइडसवर पाहा, नीता अंबानी यांचे निवडक फोटोज....