आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही अंबानी फॅमिली, मोलमजुरीने झाली होती सुरूवात, आज देशात सर्वात श्रीमंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबांनी यांची पत्नी नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. नीता यांच्या वाढदिवसानिर्मित आम्ही सुरू केलेल्या मालिकेत नीता अंबानींसह त्यांच्या कुटुंबाशी संबंधित खास माहिती देत आहोत.

अंबानी कुटुंबातील काही मोजक्याच सदस्य मीडियासमोर येतात. मात्र, अंबानी कुटुंबातील इतर सदस्य कोण? त्यांचा व्यवसाय काय? या संदर्भात आज आम्ही आपल्यासाठी धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबाशी संबंधित काही रोचक किस्से घेवून आलो आहे.

धीरूभाई अंबानी व कोकिळाबेन यांना मुकेश, अनिल, नीना व दीप्ती अशी चार मुले आहेत.

धीरूभाई अंबानी व कोकिळा बेन:
धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 ला सौराष्ट्रातील जूनागड जिल्ह्यात झाला. धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली. 1977 मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून 2007 साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता 60 अब्ज डॉलर होती.
धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती. तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. धीरूभाई यांचे निधन 6 जुलै 2002 ला झाले. त्यांनी त्यांची मालमत्तेचा वाटणी करताना त्यांची पत्नी कोकिलाबेन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

यमनमध्ये रिफायनरीत केली मोलमजुरी...
शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले. यमनहून मायदेशी परतल्यानंतर धीरुभाई यांनी चुलतभाऊ चंपकलाल दिमानी यांच्या मदतीने रिलायन्स कमर्शियल कॉरर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून धीरूभाई यांनी सुरुवातीला पश्चिमात्य देशात आलं (अदरक), हळद व इतर मसाल्यांची निर्यात केली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अंबानी कुटुंबातील अनोळखी चेहर्‍यांविषयी...