आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानी करत होत्या 800 रुपये पगाराची नोकरी, आज 13 शाळांच्या मालकीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा एक नोहेंबरला वाढदिवस होता. विवाहापूर्वी व नंतर शाळेत नोकरी करणार्‍या नीता अंबानी यांनी आज बिझनेसवुमन म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुकेश अंबानी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर नीता अंबानी एका खासगी शाळेत 800 रुपये पगाराची नोकरी करत होत्या, हे नीता अंबानी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते.

नीता यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, एका खासगी शाळेत नीता नोकरी करत होत्या. मात्र, नीता या मुकेश अंबानी यांची पत्नी आहेत, हे शाळेच्या प्राचार्यांना माहीत नव्हते. 1987 वर्ल्डकपचे स्पॉन्सर रिलायन्स ग्रुपने केले होते. प्राचार्यांनी दोन सामन्यांचे तिकिटे आणली होती. कोणतेही दोन शिक्षक सामने पाहायला जाऊ शकतात, असे प्राचार्यांनी सांगितले होते. तेव्हा नीता यांनी तिकिट घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. एका सामन्यादरम्यान नीता यांना प्रेसिडेंट बॉक्समध्ये व्हीआयपींसोबत पाहून प्राचार्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा त्यांनी माहिती काढली असता, नीता या देशातील सगळ्यात श्रीमंत कुटुंब अंबानीची सून व मुकेश अंबानी यांची पत्नी असल्याचे प्राचार्यांना समजले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नीता अंबानी व मुकेश अंबानी यांचे फोटोज...