आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मखमली कापडावर होत आहेत नवनवे प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाही रंगांत : शाही आणि रुबाबदार रंगांत मखमली आउटफिट्स शिवले जात आहेत. याचा अर्थ फिकट रंगांवर मुळीच लक्ष दिले जात नाही, असेही नाही. दोन्हीही पर्याय आहेत. डार्क निळा, हिरवा, गडद लाल, सागरी हिरवा अधिक वापरले जात आहेत.
  
ड्रेस : रफल्स असलेले मखमली ड्रेस अधिक पसंत केले जात आहेत. या ड्रेसला डिझाइन केल्यानंतर अधिक प्रयोग केले जात नाहीत. कारण याचा पोतच इतका शाही आहे की इतर फिलर्सची गरज नाही. या ड्रेसवर चांगले फुटवेअर आणि क्लच वापरता येईल. जर ड्रेसची नेकलाइन थोडी डीप असेल तर साधा नेकलेस वापरता येईल. त्यामुळे संपूर्ण लूक रुबाबदार होतो. 
 
चाेकर : मखमलीचे चोकर्स पसंत केले जात आहेत. विशेषत: थंडीच्या 
दिवसांत याला अधिक वापरले जात आहे. याशिवाय मखमली स्कार्फ हिवाळ्यातील ट्रेंड झाला आहे.  

मऊ पोत : रिंकल्सवाले मखमल नव्हे, तर प्लेन आणि मऊ मखमलीला पसंती मिळतेे. डिझाइन चांगले तरीही रिंकल्स वापरल्यास ते हीन अभिरुचीचे दिसते. त्यामुळे मखमलीच्या पोताकडे विशेष लक्ष पुरवलेय. जूल शेडचे मखमल अधिक मऊ असते. त्याला अधिक पसंती मिळत आहे.  

प्रोफेशनल लूक : मखमली ब्लेझर ऑफिस वेअरसाठी बनवले जात आहे. ते सकाळपासून ते सायंकाळपर्यंत वापरले तरीही आरामदायी वाटते. त्यांना रेशमी टॉपवर वापरले जात आहे. दोन शाही आणि मऊ पोत सोबत मुळेे शानदार लूक मिळतो. 
 
मिक्स अँड मॅच : जूल टोन्ड मखमली ड्रेस आणि मिनी स्कर्टची संगती खाकी जॅकेटसोबत टीम-अप करता येते. हार्ड आणि इझी लूकसाठी मखमलीला लेदर जॅकेटसह वापरता येते. 

 
बातम्या आणखी आहेत...