आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या स्विफ्टच्या नव्या स्वरूपाबाबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१२ वर्षांपूर्वी मारुती सुझकीने स्विफ्टला भारतात सादर केले होते. या काळात ही मारुतीची सर्वाधिक शैलीदार हॅचबॅक म्हणवली गेली, ज्याच्या यूथफुल अपीलने सर्वांना आपल्याकडे आकर्षित केले पुन्हा एक असा काळ आला, जेव्हा ऑल्टोनंतर स्विफ्ट देशात सर्वाधिक विकली जाणारी गाडी ठरली. स्विफ्ट मारुती सुझुकी ब्रँडला नेक्स्ट लेव्हलपर्यंत घेऊन गेले. यापूर्वीपर्यंत मारुती गाड्यांच्या आराखड्यावर फारसे काम केले जात नव्हते. स्विफ्ट पहिली अशी गाडी होती की, ज्याचा आराखडा काबिले तारीफ कौतुकास पात्र होता. २०१६ मध्ये मारुतीने नव्या आराखड्याच्या तत्त्वज्ञानांतर्गत बालेनो आणि ब्रिझालादेखील सादर केले आहे. आता म्हटले जाऊ शकते की खरंच सुझुकी आता डिझाइनवर काम करू लागलंय. जून-जुलै २०१७ पर्यंत ऑल न्यू स्विफ्ट सादर होणार आहे. याचा ग्लोबल डेब्यू अशातच जपानमध्ये झाला आहे.

जाणून घ्या नव्या स्विफ्टच्या बाबत....  
नव्या स्विफ्टच्या फ्रंट अँड रिअर व्ह्यूला पूर्णपणे बदलले गेले आहे. विशेष हे आहे की, याची पुढील ग्रील, ज्याचा लेआऊट ऑडी ए ३ च्या फ्रंट ग्रीलपासून प्रेरित आहे. ग्रीलच्या काठावर क्रोम वापरले गेले आहे. ए आणि बी पिलर बिलकुल असे आहेत की, जसे जुन्या स्विफ्टमध्ये होते. सी पिलरला रिडिझाइन केले गेले आहे, जसे की शेवर्लेची बीटमध्ये डोअर हँडल विंडो ग्लाससह दिले गेलेले आहे. तसेच यातही केले गेले आहे. सुझुकीची इच्छा आहे की, नवी स्विफ्ट २ डोअर स्पोर्ट््स कारसारखा फील देतील. 

फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील :  इंटेरिअरमध्येदेखील चांगलेच बदल केलेत. मोठा बदल हा आहे की, फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील, जे की लेदर रॅप्ड आहे. याशिवाय डॅशबोर्डही सर्व नवाच आहे. ए सी व्हेंट्सही नवे आहेत. हे छायाचित्र जपानमध्ये सादर केल्या गेलेल्या स्विफ्टच्या इंटेरिअरचे आहे. अपेक्षित आहे की, भारतात सादर होणाऱ्या स्विफ्टचे इंटेरिअरही असेच असेल.  
 
बातम्या आणखी आहेत...