आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • New Service Charge Will Increase The Cost Of Banking Services For The Sbi Customers

SBI ची सेवा नव्या वर्षात महागणार; खातेदारांना आर्थिक भुर्दंड बसणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बॅंक भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) खातेदारांना नव्या वर्षात आर्थिक भुर्दंड बसणार आहे. SBI ने आपल्या सेवा शुल्कात (सर्व्हिस चार्ज) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एक जानेवारी 2016 पासून ही वाढ करण्‍यात येणार असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी म्हटले आहे. यात लॉकर रेंट (भाडे) व बॅंक अकाउंट मेंटनन्स शुल्काचा समावेश असणार आहे.

याशिवाय टू व्हीलर लोन, कार लोन, होम लोन, बिल कलेक्शनवर आकारण्यात येणार सर्व्हिस चार्जमध्ये देखील वाढ होण्याची SBI ने तयारी केली आहे.

एक जानेवारीपासून SBIची सेवा महागणार
>लॉकर रेंटमध्ये वाढ करण्‍यात येणार आहे.
> चालू खातेधारकांकडून(करंट अकाउंट) तीन महिन्यात मिनिमम बॅलेंस मेंटेन न केल्यास शुल्क आकारण्यात येईल.
> खाते बंद (अकाउंट क्लोज) करण्यासाठी मोजावे लागेल शुल्क
> होम व टू व्हीलर लोनच्या प्रोसेसिंग शुल्कात वाढ
>ट्रेडर्स अकाउंटसाठी लागणार्‍या बिल कनेक्शन शुल्कात वाढ
लॉकर रेंटमध्ये होईल वाढ
> स्मॉल साइज लॉकरसाठी मेट्रो व शहरात SBI ग्राहकांकडून 1100 रुपये शुल्क आकारते. आता ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज आकारण्यात येणार आहे.
> मीडियम साइज लॉकरसाठी सध्या 2800 रुपये आकारण्यात येतात. त्यावर सर्व्हिस चार्ज आकारला जाईल.
>छोट्या शहरात तसेच ग्रामीण भागात बँक मीडियम साइज लॉकरसाठी 1700 रुपये आकारले जातात. त्यात 100 रुपयांची वाढ करण्‍यात आली आहे. आता ग्राहकांना लॉकरसाठी 1800 रुपये मोजावे लागतील. या शिवाय ग्राहकांना सर्व्हिस चार्ज देखील द्यावा लागणार आहे.
>याचप्रमाणे मोठ्या लॉकरसाठी वार्षिक 6000 ते 8000 रुपये आकारले जातील. सध्या हे शुल्क 5000 ते 7500 रुपये आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, अकाउंट क्लोज केल्यास द्यावे लागेल शुल्क