आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी 12 लाख लोकांना रोजगार, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्मितीस प्रोत्साहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मागणी वाढल्याने या क्षेत्रात निर्मितीसाठी शक्यता वाढल्या आहेत. साधारणत: सर्व क्षेत्रांत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची मागणी होत असते, पण यासाठी देशात स्किल्ड कामगारांची अपेक्षेपेक्षा कमतरता आहे. काही वर्षांत या क्षेत्रात रोजगारासाठी नव्या संधी मिळतील. यामुळे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग करणाऱ्यांना यात उत्तम शक्यता-संधी आहेत. 
 
अशातच सादर केल्या गेलेल्या अर्थसंकल्पात एसईझेडमध्ये प्लॉट असणाऱ्यांना भांडवली गुंतवणुकीवर २० टक्के आणि नॉन एसईझेड भागात २० टक्के अनुदान मिळेल. यासाठी एमसिप्स आणि ईडीएफ योजनांच्या मदतीने ७४५ कोटी रुपये ठेवले गेले आहेत. उद्योगातील तज्ज्ञ मोठ्या प्रोत्साहनाच्या रूपात पाहतात आणि यास रोजगारातील नव्या संधी बनविण्याची शक्यता आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अनुसार इलेक्ट्रॉनिक आणि आयटी हार्डवेअर क्षेत्रात २०२२ च्या शेवटपर्यंत ८९ लाख स्किल्ड वर्करची गरज असेल.  
एका अहवालानुसार देशातील इलेक्ट्रॉनिक मार्केट ४१.४ टक्के वार्षिक दराने वाढत आहे आणि २०२२ च्या शेवटपर्यंत याची ४०० अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, २०१५ मध्ये देशाचा सेमी कंडक्टरचा बाजार जवळपास १४.५ अब्ज डॉलरचा होता, तो आणखी २९.४ टक्के वार्षिक दराने वाढून २०२० च्या शेवटपर्यंत ५२.५८ अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे.  इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात टेलिव्हिजन, संगणक, टेलिकम्युनिकेशन व इतर उत्पादनाची निर्मिती केली जाते. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरचे काम इलेक्ट्रॉनिकशी संबंधित समस्यांवर उत्तम मार्ग काढणे आणि असे उत्पादन बनविणे, जे सध्याच्या परिस्थितीत सहज सोपे असेल. ही इंजिनिअरिंगची कोर ब्रँचमधून एक आहे. यात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या आरेखनापासून ते याच्या उपयोगापर्यंत शिक्षण होते. 

विज्ञान शाखेत बारावी आवश्यक 
विज्ञान शाखेत बारावी करणारे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषय गरजेचा आहे. बारावीत कमीत कमी ५० टक्के गुणांची गरज आहे. यानंतर विद्यार्थी जेईई मेनच्या माध्यमातून देशातील विभिन्न अभियांत्रिकी महाविद्यालयांत इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या बीटेक वा बीई कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थी याच्या पदविका अभ्यासक्रमालादेखील प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थी एमटेक कोर्समध्ये प्रवेशासाठी अधिकांश संस्थांमध्ये गेट स्कोअर आणि पदवी कोर्समध्ये ६० टक्के गुण मात्र आवश्यक आहेत.  

सरकारी कंपनीत नोकरीच्या संधी  : इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी केंद्र सरकार, राज्य सरकारद्वारा संचालित सार्वजनिक उद्योग, खासगी संघटना - जसे की ऑल इंडिया रेडिओ, इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज, एमटीएनएल, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीज, एअर सिव्हिल एव्हिएशन विभाग, पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट, को-ऑर्डिनेशन डिपार्टमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि विविध राज्यांच्या डेव्हलपमेंट सेंटरमध्ये नोकरी करू शकतात. याशिवाय देश आणि विदेशांतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्येदेखील शिक्षकाच्या रूपात नोकरी करू शकतात. 

अनुभवानंतर एक चांगले पॅकेज : या क्षेत्रात फ्रेशरला १५ ते २० हजार रुपये प्रतिमहाचे पॅकेज मिळू शकते. काही‌ वर्षांच्या अनुभवानंतर हे पॅकेज ४ ते ५ लाख रुपये वार्षिकपर्यंत असू शकते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)