नवी दिल्ली - अन्न प्रक्रिया उद्योगात २०२४ पर्यंत २.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तसेच ८८ लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये आठ लाख सरळ नोकऱ्या राहणार असून ८० लाख लोकांना यामुळे रोजगार मिळेल. उद्योग संघटना असोचेम आणि कन्सल्टन्सी कंपनी ग्रँट थॉर्टनच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.