आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Mistry, Tata front War Between The Start Of The Stage Today, Cyrus Mistrim Of Deportation For TCS Special Session Today

टाटा-मिस्त्री यांच्यातील लढाईचा पुढला टप्पा आजपासून सुरू, सायरस मिस्त्रींच्या हद्दपारीसाठी टीसीएसची आज विशेष सभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील लढाईचा पुढला टप्पा मंगळवारी सुरू होणार आहे. समूहातील कंपन्यांतून मिस्त्रींना हद्दपार करण्यासाठी ग्रुप कंपनी टाटा सन्सने सहा कंपन्यांना विशेष सभा बोलावण्यास सांगितले. पहिली सभा टीसीएसची असून ती मंगळवारी होईल. टीसीएस ही टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी आहे. ग्रुपच्या महसुलात याची भागीदारी ७४ टक्के आहे.

बैठकीत भागधारक मिस्त्रींना कंपनीच्या संचालक पदावरून हटवण्यासाठीच्या प्रस्तावावर मतदान करतील. टीसीएसमध्ये टाटा सन्सची ७३.३३ टक्के होल्डिंग असल्याने मिस्त्रींना तेथून हटवणे अवघड जाणार नाही.
विश्लेषकांच्या मते, नॉन प्रमोटर ग्रुप मतदान कसे करतात यावरच पुढील विशेष सभेचे निर्णय अवलंबून असतील. इतर कंपन्यांमध्ये प्रमोटर ग्रुपची होल्डिंग ३० ते ३८ टक्क्यांपर्यंत आहे. नुस्ली वाडिया यांना स्वतंत्र निदेशक पदावरून हटवण्यासाठीच्या प्रस्तावावरही टाटा मोटर्स, टाटा स्टील्स आणि टाटा केमिकल्सच्या भागधारकांना निर्णय द्यायचा आहे.

मिस्त्रींना १० नोव्हेंबरलाच टीसीएसच्या चेअरमनपदावरून हटवण्यात आले आहे. ईशात हुसेन यांना नवीन चेअरमन बनवण्यात आले आहे. या निर्णयानंतर टाटा हे टीसीएसला अमेरिकन कंपनी आयबीएमला विकण्याच्या तयारीत असल्याचे मिस्त्रींनी म्हटले होते. मिस्त्रींना २४ ऑक्टोबरला टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून हटवण्यात आले होते.
मिस्त्रींनी इंडियन हॉटेल्सच्या भागधारकांकडून समर्थन मागितले. दरम्यान, स्वतंत्र निदेशक आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे चेअरमन नुस्ली वाडियाने टाटा स्टीलच्या भागधारकांच्या नावे चिठ्ठी लिहिली. ते म्हणाले, मी टाटा स्टीलच्या टाटा समूहाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळे समुहाच्या हिताचे काम करण्याची गरज नाही. मी स्वतंत्र निदेशक असल्याने कंपनीच्या हिताचे काम करणार आहे.

२६ डिसेंबरपर्यंत ६ कंपन्यांची सभा
कंपनी विशेष सभा प्रमोटर होल्डींग
टीसीएस १३ डिसेंबर ७३.३३%
इंडियन हॉटेल्स २० डिसेंबर ३८.६५%
टाटा स्टील २१ डिसेंबर ३१.३५%
टाटा मोटर्स २२ डिसेंबर ३३.००%
टाटा केमिकल्स २३ डिसेंबर ३०.८०%
टाटा पावर २६ डिसेंबर ३३.०२%
(सप्टेंबर २०१६ नुसार प्रमोटर होल्डींग, स्त्रोत : बीएसई)
टाटा इंडस्ट्रीजमधून मिस्त्रींना हटवले : सोमवारी मिस्त्रींना टाटा इंडस्ट्रीजच्या संचालक, चेअरमन पदावरून हटवण्यात आले. भागधारकांच्या विशेष सभेत मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
टाटा इंडस्ट्रीज ही कंपनी टाटा सन्सची उपकंपनी आहे. यात टाटा मोटर्स, टाटा पाॅवर, टाटा स्टीलसारख्या ग्रुप कंपन्यांचीही होल्डिंग आहे. नवीन व्यवसायात समूहाचा विस्तार, ऑपरेटिंग कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे काम कंपनी पाहते.
पुढे पाहा, मिस्त्रींना हटवल्याचे पत्र...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...