आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनडीए सरकारने रुपयाचेही कर्ज राइट ऑफ केले नाही : जेटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रातील एनडीए सरकारने कोणत्याही कंपनीचे एक रुपयाचेही कर्ज बुडीत खात्यात (राइट ऑफ) टाकले नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचीही सरकारची कोणतीच योजना नाही.
 
शुक्रवारी लोकसभेत विचारण्यात अालेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. असे असले तरी याच आठवड्यात अर्थ मंत्रालयाने पाच वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे २.५ लाख कोटींचे कर्ज राइट ऑफ केले असल्याचे सांगितले होते. 

कृषी आणि कृषीशी संबंधित क्षेत्रातील एनपीए ३१ मार्च २०१७ रोजी ६२,३०७   कोटी रुपये झाला असल्याचे जेटली यांनी सांगितले. राज्यांच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीची आकडेवारी केंद्र सरकार स्वत:कडे ठेवत नाही. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार कर्ज राइट ऑफ केल्यामुळे कृषी आणि कृषीशी संबंधित क्षेत्रातील एनपीए २०१६-१७ मध्ये ७,५४८ कोटी रुपये कमी झाला आहे. पुढील काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांचे माफ करणार आहे का, या प्रश्नावर असा कोणताच निर्णय झाला नसल्याचे अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी पाच वर्षांत सर्वात जास्त ८१,६८३ कोटींचे कर्ज राइट ऑफ झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...