आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी ३.४ लाख रुपयांचा काळा पैसा जातो विदेशात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काळा पैसा विदेशात पाठवल्याच्या प्रकरणात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. २००४ ते २०१३ दरम्यान भारतातून सुमारे ५१ अब्ज डॉलर (३.४ लाख कोटी रुपये) काळा पैसा दुसऱ्या देशात पाठवण्यात आला. अमेरिकी थिंकटँक ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटीच्या वार्षिक अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. हा पैसा आपल्या संरक्षणाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त आहे. २०१५-१६ साठी भारताने संरक्षणासाठी २.४६ लाख कोटी रुपये ठेवले आहेत. काळा पैसा विदेशात जाण्याबाबत टॉप तीन देशांमध्ये चीन, रशिया आणि मेक्सिको यांचा समावेश आहे. यातील जास्तीचा पैसा हा करचोरी, क्राइम, भ्रष्टाचार आदींचा असतो.

या अहवालात २०१३ पर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या वर्षी विकसनशील देशांमधून एकूण १.१ लाख कोटी डॉलर (७३ लाख कोटी रुपये) काळा पैसा बाहेर गेला आहे. २००४ मध्ये हा आकडा फक्त ४६५.३ अब्ज डॉलर (३१ लाख कोटी रुपये) होता. २००४ ते २०१३ दरम्यान विकसनशील देशांमधून ७.८ लाख कोटी डॉलर (५१८ लाख कोटी रुपये) काळा पैसा बाहेर गेला, जो या देशांच्या जीडीपीच्या चार टक्के आहे. यातील ६.५ लाख कोटी डॉलर (४३२ लाख कोटी रुपये) व्यापारातील फसवणुकीच्या माध्यमातून गेले. जीएफआयच्या अंदाजानुसार, २००४ ते २०१३ पर्यंतच्या दहा वर्षांत भारतातून ५१० अब्ज डॉलर, चीनमधून १.३९ लाख कोटी डॉलर दुसऱ्या देशात जमा झाले.
कोणत्या देशातून किती पैसा गेला?
चीन ९.२५
ब्राझील १.५०
रशिया ६.९८
द. आफ्रिका १.३९
मेक्सिको ३.५१
थायलंड १.२७
भारत ३.४०
इंडोनेशिया १.२०
मलेशिया २.७८
नायजेरिया १.१८