आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्रेडिट स्कोअर’ची माहिती १५% लोकांना नाही, विभाग देशात असल्याची माहितीही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या “क्रेडिट स्कोअर’बाबत अनेक लोकांना माहिती नाही. मोठ्या मेट्रो शहरात राहणाऱ्या १५ टक्के लोकांना यासंबंधी कोणतीच माहिती नसल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर क्रेडिट ब्यूरोला देशात काम सुरू करून एक दशकापेक्षा जास्त वेळ झाला असला तरी अशा प्रकारे स्कोअर निश्चित करणारा विभाग भारतात काम करतो याची माहितीही ५० टक्के लोकांना नसल्याचे या अहवालात समोर आले आहे.

मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, चेन्नई आणि हैदराबादसह आठ महानगरांमध्ये राहणाऱ्या १५०० लोकांना प्रश्न विचारून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्व्हेच्या अहवालानुसार देशातील बहुसंख्य लोक क्रेडिट ब्यूरो किंवा क्रेडिट स्कोअरविषयी अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. यामध्ये फक्त १५ टक्के लोकांना क्रेडिट स्कोअरविषयी माहिती होती. असे असले तरी ७० टक्के लोकांना माहिती होते की, चांगली क्रेडिट हिस्ट्री आणि स्कोअरमुळेे त्यांना सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते. चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर त्यांना व्याज देखील कमी द्यावे लागणार असल्याचे ४१ टक्के लोकांना माहिती होते. सर्व्हेमध्ये समोर आलेली आकडेवारी मजेशीर वाटते कारण, सिबिल आणि एक्सपेरियनसारखे अर्धा डझन विभाग गेल्या दशकापेक्षा जास्त काळापासून भारतात काम करत आहेत.

दशकापासून काम सुरू
देशात क्रेडिट स्कोअर देणारा विभाग किंवा संस्था सुमारे एक दशकापेक्षा जास्त कालावधीपासून काम करत आहेत. तसेच कर्ज देण्यासाठी बँकांनी क्रेडिट स्कोअर अनिवार्य केला आहे. असे असले तरी महानगरांमध्ये अनेक लोकांना याविषयी माहिती नाही.महानगरांमधील फक्त १५ टक्के लोकांना या विषयी माहिती आहे.

११ टक्के लोकांनी घेतला क्रेडिट रिपोर्ट
कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार कर्ज घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा क्रेडिट रिपोर्ट मोफत उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. मात्र, फक्त ११ टक्के लोकांनीच स्वत:चा क्रेडिट रिपोर्ट मागितला आहे. कर्ज घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लोकांची संख्या पाहता हा आकडा खूपच कमी आहे. कर्ज घ्यायचे नसेल तरी क्रेडिट रिपोर्ट घ्यावा, कारण यामुळे आपल्या “क्रेडिट हिस्ट्री’ची माहिती मिळते. यामध्ये विविध बँकांच्या वतीने तसेच आर्थिक संस्थांच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्जाची तसेच भरण्याची माहिती मिळते. त्यात काही त्रुटी आढळल्यास “ऑनलाइन डिस्प्यूट रिझोल्युशन फोरम’च्या माध्यमातून संपर्क करून त्यात सुधारणा करता येते.
बातम्या आणखी आहेत...