आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर हल्ल्याने बँकांचे 27 हजार कोटींचे नुकसान, विमा काढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - सायबर हल्ल्यांचे संकट वाढत असल्याने तसेच नोटाबंदीनंतर सरकारच्या वतीने डिजिटायझेशनवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याने बँकांचा सायबर विमा करण्याकडे कल वाढला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील २० बँका सायबर विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करत आहेत.
 
 या संदर्भात खासगी बँकांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्सिस बँकेने एचडीएफसी अॅर्गोकडून आधीच सायबर विमा काढलेला आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये सायबर गुन्ह्यांमुळेच सुमारे २६,८०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तर जागतिक पातळीवर यामुळे होणारे नुकसान सुमारे ३० लाख कोटी रुपये आहे.  
 
सायबर गुन्हेगारी वर्षाकाठी सरासरी ४० ते ५० टक्क्यांच्या दराने वाढत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात अाला आहे. जागतिक सायबर जोखीम विमा प्रीमियम २०१६ मध्ये २३,४५३ कोटी रुपये होता, जो २०१५ मध्ये केवळ १६,७५२ कोटी रुपये होता. या अाकडेवारीवरूनच जगभरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तेजीने वाढ झाली असल्याचे लक्षात येते
 
. त्यामुळेच गेल्या वर्षी सायबर फसवणूक सहन कराव्या लागणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या एसबीआय बँकेने आता आपल्या ३० कोटींपेक्षा जास्त ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी विमा काढण्याचा विचार सुरू केला आहे.  
 
एसबीआयने बँकांच्या विमा सल्लागारांच्या मंडळात सहभागी असलेल्या एका कंपनीला या संदर्भात अहवाल तयार करण्यास सांगितले असल्याची माहिती एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी दिली. याचप्रमाणे भविष्यात अशा प्रकारचा विमा काढण्यासाठीच्या विषयावर बँक ऑफ बडोदा (बीओबी) देखील गंभीरतेने विचार करत आहे.
 
या बँकेच्या सुमारे एक लाख  डेबिट कार्डबाबत आधीच एक प्रकरण चर्चेत आलेले आहे. बँका ग्राहकांच्या  हिताचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत असून आवश्यकता भासल्यास आम्ही  सायबर विमा करू, असे बीओबीचे व्यवस्थापकीय संचालक पीएस जयकुमार  यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...