आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव्या तिमाहीत विकासदरात घसरण राहील; चिदंबरम यांनी केला अर्थव्यवस्थेचा पंचनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नोटाबंदीमुळे िवकासदर २ टक्क्यांनी कमी होईल, असे डाॅ. मनमोहन सिंग म्हणाले होते आणि आता खरे ठरले आहे. सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घसरण झाली असून येणाऱ्या तिमाहीतही ही घसरण कायम राहील, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या काळातील अर्थव्यवस्थेचा पंचनामा केला.    

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नोटाबंदीच्या देशाच्या अर्थकारणावर झालेल्या परिणामाचा पाढा चिदंबरम यांनी वाचला. नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरली असून बनावट चलनी नोटा, दहशतवाद, काळा पैसा रोखणे यापैकी एकही उद्देश सफल झाला नाही. नोटाबंदीनंतरही २००० च्या बनावट नोटा अनेक ठिकाणी आढळून आल्या. नोटाबंदीनंतर २०१७ या वर्षात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या संख्येत मोठी वाढ झाली. काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तामिळनाडूच्या आर. के. नगर मतदारसंघातील निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली. या निवडणुकीत वापरलेला पैसा काळा होता की पांढरा? असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.   मनमोहन सिंग यांच्या काळात जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जात होते. मात्र, आता तसे चित्र नाही. नवीन नोटा छापण्यावर ८ हजार कोटींचा खर्च झाला असून नोटांची वाहतूक, एटीएममधील बदल, जुन्या नोटा जमा करणे, त्या जुन्या नोटांची विल्हेवाट लावणे यावर झालेला आणि होणारा खर्च वेगळा आहे. एकूणच नोटाबंदीवर २१ हजार कोटी खर्च झाले.

अपयशाची कबुली 
लघु उद्याेगमंत्री कलराज मिश्रा, कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांना मंत्रिमंडळातून वगळून आणि रेल्वे व वाणिज्य मंत्री यांना त्यांच्या खात्यावरून पायउतार करत सरकारने अप्रत्यक्षपणे अपयशी ठरल्याचे मान्य केले, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले. त्याच वेळी नोटाबंदीवरून अपयशी ठरल्याबद्दल मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले.  
बातम्या आणखी आहेत...