आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न प्रक्रिया उद्याेगात दहा वर्षांमध्ये ९०लाखनोकऱ्या उपलब्ध होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात आगामी १० वर्षांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगात ९० लाख राेजगारांच्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज सीआयआयने व्यक्त केला आहे. १०० टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी दिल्यानंतर त्यात आणखी वाढ होऊ शकते. दरवर्षी या उद्योगात एक लाखापेक्षा जास्त प्रशिक्षित व्यावसायिकांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या ही गरज निम्म्यावरच भागते ही वस्तुस्थिती आहे.
सरकारच्या प्राधान्यक्रम क्षेत्रात सहभागी अन्न प्रक्रिया उद्योग सर्वांत वेगाने वाढणाऱ्या उद्याेगात समाविष्ट आहे. भारतीय उद्योग महासंघानुसार(सीआयआय) देशातील अन्न उद्योगात ३२ टक्के वाटा एकट्या अन्न प्रक्रिया क्षेत्राचा असून तो आणखी वाढतच आहे. गेल्या १५ वर्षांत अन्न प्रक्रिया उद्योगात ६.७० अब्ज डॉलर विदेशी गुंतवणूक आली. येत्या दहा वर्षांत हा आकडा ३३ अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. गतिशील विकासामुळे १० वर्षांत या क्षेत्रात ९० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सरकार आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांव्यतिरिक्त या उद्योगात विद्यार्थ्यांसाठी उद्यमशीलतेची शक्यताही अस्तित्वात आहे.

सरकारीकार्यालयांपेक्षा खासगी क्षेत्रात नाेकरीच्या जास्त संधी
सरकारीक्षेत्रात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग दरवर्षी मोठ्या संख्येने अन्न तंत्रज्ञांची नियुक्त करतो. याशिवाय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये त्यांच्यासाठी संधी आहे. मात्र, यापेक्षा खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी जास्त आहेत. खासगी क्षेत्रात दूध उत्पादने, फळे आणि भाजी, फिशरिज, प्लँटेशन, कन्फेक्शनी, बेव्हरेजेस, हेल्थ फूडस यासारख्या क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची आवश्यकता आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाव्यतिरिक्त संशोधन प्रयोगशाळा, सॉफ्ट ड्रिंक कारखाने, डिस्टिलरी, हॉस्पिटॅलिटी, पॅकेजिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात उत्पादने, क्वालिटी अॅश्योरन्स, संशोधन आणि विकास क्षेत्रात फूड टेक्नॉलॉजी पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी संधी असू शकतात. पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी अध्यापन क्षेत्राचा पर्याय निवडू शकतात.

बारावीनंतरप्रवेश करू शकता
फूडआणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीचे यूजी, पीजी आणि डिप्लोमा कोर्स देशभरातील संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेतून बारावी केलेले विद्यार्थी यूजी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राॅप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, तंजावरच्या बीटेक कोर्समध्ये जेईई मेन्सच्या रँकिंगच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अनेक संस्थांमध्ये या विषयाचा बीएस्सी कोर्सही आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी कृषी, फूड टेक्नॉलॉजी, होम सायन्स यासारख्या विषयात पदवी आवश्यक आहे. याशिवाय मार्केटिंग, मटेरियल, सप्लाय चेन, ऑपरेशन्स आणि ह्यूमन मनुष्यबळ व्यवस्थापनमध्ये स्पेशलायझेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रवेशाच्या संधी निर्माण होऊ शकतात.

तेलाख रुपये वार्षिक पॅकेज
अन्नप्रक्रिया उद्योगात यूजी कोर्स करून प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीचे वार्षिक पॅकेज दीड ते दोन लाख रुपये असते. दोन-तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना ते लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळू शकते. पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांना सुरुवातीचे वार्षिक पॅकेज ते लाख रुपये मिळते. दुसरीकडे, व्यवस्थापन पदवीप्राप्त विद्यार्थ्यास अडीच ते तीन लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी मिळू शकते.

प्रशिक्षित व्यावसायिकांचा तुटवडा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न
एकाअंदाजानुसार या क्षेत्रात दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त प्रशिक्षित व्यावसायिकांची आवश्यकता आहे. मात्र, अर्ध्यावर उमेदवारच उपलब्ध होतात. ही समस्या दूर करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने मनुष्यबळ विकासासाठी विशेष योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत फूड प्रोसेसिंगची पदवी आणि डिप्लोमा कोर्ससाठी पायाभूत विकास, उद्यमशीलता विकास, अन्न प्रक्रिया आणि राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर प्रशिक्षणाची व्यवस्था आहे.

पाचवर्षांत २२.५ % वाढला पॅकेज्ड फूडवरील खर्च
असोचॅमच्याएका सर्वेक्षणानुसार देशात अन्न प्रक्रिया उद्योग वेगाने वाढ होण्यामागे हवाबंद अन्नपदार्थावरील वाढता खर्च हे एक कारण आहे. सर्वेक्षणानुसार, २०१० ते २०१५ दरम्यान पाच वर्षांत देशात पॅकेज्ड फूडवर होणाऱ्या खर्चात २२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१७ पर्यंत हा आकडा ३२ टक्के होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...