आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षे 15% दराने वाढेल एफएमसीजी उद्योग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एफएमसीजी उद्योगाचा विकास तीन वर्षांपासून मंदीत असला तरी येत्या दोन ते तीन वर्षांत या क्षेत्राची १५ टक्क्यांच्या दराने वाढ होईल. यासाठी कंपन्यांना आपल्या ब्रँडची ओळख वाढवावी लागणार आहे. उद्योग संघटना सीआयआय आणि कन्सल्टन्सी संस्था बेन अँड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या अभ्यास अहवालात ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार कंपन्यांनी मंदीच्या काळात महसूल वाढवण्याऐवजी जास्त नफा मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  
 
या क्षेत्रातील २२ श्रेणींपैकी १८ श्रेणींमध्ये २०१६ मध्ये वाढ नोंदवण्यात आली होती. ज्या श्रेणी जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, त्यांची विक्री जास्त वाढली असल्याचे दिसून आले. म्हणजेच टूथपेस्ट आणि हेअर ऑइल ९५ टक्के भागात पोहोचले असून यामध्ये वाढही चांगली झाली आहे.  
 
मागणी वाढली  
०९  टक्के वाढ राहिली गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत. ग्रामीण भागातील मागणी वाढीचा दर शहरापेक्षा १.७ पट जास्त.  
१० टक्के वाढ खाद्यपदार्थांच्या विक्रीत. हा वाढीचा दर सर्वात जास्त असून मोठ्या शहरात मागणी जास्त वाढली.  
०९ टक्के वाढ ‘होम केअर’ विभागातही झाली. मात्र, यात छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात जास्त मागणी होती.
 
बातम्या आणखी आहेत...