आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार औषधांच्या किमती निश्चित, 14 मध्ये दुरुस्ती : एनपीपीए

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वसामान्य रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या आणखी चार आवश्यक औषधांच्या किमती आता सरकारच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत, तर १४ आणखी औषधांच्या किमतीमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यामध्ये बुरशीजन्य संसर्ग आणि उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा समावेश आहे. औषधी नियामक एनपीपीएच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. 

या संदर्भात ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटी - एनपीपीएच्या  किंमत नियंत्रण आदेश डीपीसीओ २०१३ अंतर्गत अनुसूची - एकमध्ये समाविष्ट असलेल्या औषधांच्या किमान विक्री मूल्याचे नियंत्रण करता येते. सध्या ६२० औषधे याअंतर्गत सरकारच्या नियंत्रणात आहेत. या सर्व औषधांच्या किमती सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आल्या आहेत. 
 
 या नियमाअंतर्गत  ज्या औषधांच्या किमती  सरकारच्या नियंत्रणात येत नाहीत, अशा औषधांच्या किमतीमध्ये किमान किरकोळ विक्री मूल्यात (एमआरपी) वार्षिक १० टक्के वाढ करण्याची निर्मात्यांना परवानगी असते. प्राधिकरण कोणत्याही एका उपचारांतर्गत येणाऱ्या सर्व औषधांची किमान किंमत निश्चित करते. या औषधांची विक्री एक टक्क्यापेक्षा जास्त हवी. त्यानुसार आता बुरशीजन्य संसर्ग आणि उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा समावेश यामध्ये करण्यात आला असल्याची माहिती एनपीपीएच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धि पत्रकात देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...