आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत बँक खात्यासोबत मोफत डिमॅट खाते उघडण्यावर सरकारचा विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँकेत बचत खाते उघडल्यास त्यासोबतच डिमॅट खाते उघडण्यावर सरकार विचार करत अाहे. केवायसीच्या कडक नियमांमुळे समोर आलेल्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्याचा सरकारचा विचार आहे. तुमचे डिमॅट खाते चालू आहे किंवा त्यावर व्यवहार नाही, याचे काही देणेघेणे नसल्याचे अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सर्व खातेधारकांकडे बचत खात्याबरोबरच डिमॅट खाते देखील असायला हवे, त्याचबरोबर खाते उघडण्याची प्रक्रियादेखील अधिक सोपी होईल, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये डिमॅट खाते मोफत उघडले जाणार असले तरी खातेधारकाने त्याचा वापर केल्यास शुल्क वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी त्यांच्या बचतीचा मोठा भाग शेअर बाजारात गुंतवणूक करावा, यासाठी सरकार प्रयत्न करत अाहे. त्यासाठी डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या ग्राहकांना खाते उघडण्यासाठी एक अर्ज भरावा लागत असून जर डिमॅट खाते उघडायचे असल्यास अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. या विषयी नुकतीच एक बैठक झाली असून या बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमोर या मुद्द्यांवर चर्चा झाली. शेअरची खरेदी-विक्री इलेक्ट्रॉनिक स्वरुपात होत असल्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते आवश्यक अाहे. आता पूर्वीप्रमाणे कागदाचे शेअर दिले जात नाही.
गुंतवणूक वाढेल
सर्व बँक खातेदारांचे एक डिमॅट खाते उघडण्यावर सध्या चर्चा करण्यात येत आहे. यामुळे शेअर बाजारात छोट्या गुंतवणूकदारांची भागीदारी वाढवण्यास मदत मिळेल.
व्ही. आर. नरसिंहन, मुख्य नियामक अधिकारी, एनएसई