आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीसीओप्रमाणे मिळेल वायफाय: गरजेनुसार छोट्या पॅकची करता येईल खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुढील काळात पीसीओप्रमाणे वायफाय हॉटस्पॉट सुरू होतील. देशात स्वस्त इंटरनेट सेवा देण्यासाठी दूरसंचार नियामक ट्रायने छोटे उद्योजक आणि दुकानदारांना वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. देशातील लोकसंख्येचा मोठा भाग अजूनही इंटरनेटपासून दूर आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात मोठे सेवा प्रदाता अयशस्वी होतील. त्यामुळे छोट्या - छोट्या सेवा प्रदात्यांना या सेवेत आणण्याची तसेच प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.  
 
इंटरनेट सेवा स्वस्त करण्यासाठी दूरसंचार नियामक ट्रायच्या वतीने अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वायफाय सुविधा देण्यासाठी वायफायसाठी लागणाऱ्या उपकरणांवरील आयात शुल्क रद्द करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नियामकांच्या वतीने ‘पब्लिक डाटा ऑफिस’ आणि ‘अॅग्रीगेटर’ चीन नवीन कल्पनादेखील ट्रायच्या वतीने सुचवण्यात आली आहे. 
 
सार्वजनिक वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून ब्रॉडबँड सेवेचा विस्तार होणे अपेक्षित अाहे. यामुळे सार्वजनिक हॉट-स्पॉटची संख्या तर वाढेलच, त्याचबरोबर इंटरनेट सेवादेखील स्वस्त होईल. वाणिज्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर वायफाय उपकरणांवरील आयात शुल्क कमी करण्यावर विचार झाला पाहिजे. यामुळे इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे स्वस्त होणार असल्याचे ट्रायने सांगितले आहे. दूरसंचार क्षेत्रात नसलेल्या कंपन्यांच्या वतीने सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट बनवण्यासंदर्भात ट्रायने गेल्या वर्षी जुलै महिन्यात लोकांकडून सूचना मागवल्या होत्या. वायफायचे इन्फ्रास्ट्रक्चर स्वस्त झाल्यास तेज गती असलेले इंटरनेट ९० टक्क्यांपर्यंत स्वस्त होईल. वायफाय नेटवर्कमध्ये प्रती एमबी दोन पैशापेक्षा कमी खर्च लागण्याचा अंदाज नियामकाने लावला आहे. सध्या २ जी, ३ जी आणि ४ जी नेटवर्कमध्ये ग्राहकांना सरासरी एक एमबीसाठी २३ पैसे द्यावे लागतात.
 
रोजगार वाढतील : या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास वाय-फाय सेवेमध्ये मोठ्या संख्येत छोट्या कंपन्या येतील, असा दावा ट्रायने केला आहे. यामुळे ग्रामीण पातळीवर लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. तसेच रोजगारात मोठी वाढ होईल.
 
ई-केवायसी आणि ई-सीएएफ 
केवायसीसाठी ट्रायने ई-केवायसी आणि ई-सीएएफ (कस्टमर अॅक्विजिशन फॉर्म)ची शिफारस केली आहे. सेवा देणाऱ्या कंपनीला ई-केवायसी, तपासणी आणि ‘रेकॉर्ड कीपिंग’सारख्या अटींचे पालन करावे लागेल.
 
एकच ओटीपी 
सध्या वायफाय नेटवर्कमध्ये अॅक्सेस करण्यासाठी प्रत्येक वेळी वन-टाइम पासवर्ड (ओटीपी)ची आवश्यकता होती. ट्रायने या ओटीपीला रद्द करण्याची शिफारस केली आहे. 
 
किराणा दुकानात वायफाय सुविधा 
गल्लीत असलेले किराणा दुकानदारदेखील वायफाय हॉटस्पॉटप्रमाणे काम करू शकतील. ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एका संकलकाची आवश्यकता असेल. याच माध्यमातून प्रमाणीकरण आणि भरणा याची व्यवस्था करता येईल. इंटरनेट सेवा प्रदाता (उदा. दूरसंचार कंपनी) कडून बँडविड्थची खरेदी करून असे संकलक त्यांचे रीसेल करू शकतील. यासाठी त्यांना परवान्याची आवश्यकता नसेल. मात्र, त्यासाठी नोंदणी करावी लागेल.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...