आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीडीपी विकासदराचा अंदाज घटवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रसरकारच्या वतीने आर्थिक वर्ष २०१४-१५ साठी सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) विकासदराचा अंदाज कमी करून तो ७.२ टक्के करण्यात आला आहे. याआधी हा अंदाज ७.३ टक्के होता. कृषी आणि औद्योगिक उत्पादनांशी संबंधित आकडेवारीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने (सीएसओ) शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.
२०१३-१४ साठीच्या जीडीपी विकासदराचा अंदाज आधी ६.९ टक्के राहिला असल्याचे सांगण्यात आले होते. त्यातही घट करण्यात आली असून तो ६.६ टक्के करण्यात आला आहे. २०११-१२ आणि २०१३-१४ साठीच्या अाकडेवारीतही बदल करण्यात आला असल्याचे सीएसओच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. कृषी आणि औद्योगिक उत्पादनातील नवीन आकडेवारीचा वापर करून ही नवी अाकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

आकडेवारीतबदल
गेल्यावर्षी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने २०१४-१५ आणि २०१३-१४ साठी जीडीपी विकासदराचा अंदाज अनुक्रमे ७.३ टक्के आणि ६.९ टक्के व्यक्त करण्यात आला होता. याआधी २०१४-१५ साठी जीव्हीएचा अंदाज ७.२ टक्के सांगण्यात आला होता. अर्थव्यवस्थेेच्या विकासाची गती मोजण्यासाठी गेल्या वर्षीपासून "जीव्हीए' ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली होती. त्यानुसार या आकडेवारीत बदल करण्यात आले आहेत. या आधी देखील सरकारच्या वतीने जीडीपी विकास दराच्या या आकडेवारीत बदल करण्यात आला होता.