आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारी-मार्चदरम्यान सोने आयात 112 % जास्त, विक्रीत 15 % वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
३२,४२०  कोटी रुपयांची मार्च तिमाहीत सोन्याची खरेदी, गेल्या वर्षीपेक्षा १८ टक्के जास्त - Divya Marathi
३२,४२० कोटी रुपयांची मार्च तिमाहीत सोन्याची खरेदी, गेल्या वर्षीपेक्षा १८ टक्के जास्त
मुंबई - या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान सोने आयातीत ११२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्च तिमाहीमध्ये १२७.४ टन सोने आयात झाले होते, या वेळी २७०.१ टन सोने आयात झाले.  हा आकडा गेल्या दोन वर्षांतील सर्वात जास्त आहे. या आधी २०१४ च्या शेवटच्या तिमाहीमध्ये २७९.५ टन सोने आयात झाले होते. जागतिक सोने परिषदेच्या (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) वतीने गुरुवारी जारी करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. देशात सोन्याची विक्रीदेखील १५ टक्क्यांनी वाढली आहे. मार्च तिमाहीमध्ये १२३.५ टन सोन्याची विक्री झाली, गेल्या वर्षी या समान कालावधीत देशात १०७.३ टनांची मागणी होती. किमतीच्या दृष्टीने विचार केल्यास मागणीत १८ टक्क्यांची वाढ झाली आहे.  
 
गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीमध्ये २७,५४० कोटींच्या तुलनेमध्ये यावर्षी ३२,४२० कोटी रुपयांचे सोने खरेदी करण्यात आले. २०१६ मध्ये सहा वर्षांतील सर्वात कमी ६६६.१ टन सोन्याची मागणी होती. आयातदेखील ३९ टक्क्यांनी कमी होऊन ५५७.७ टनांवर आली होती.
 
गेल्या वर्षी सोने खरेदीवर लावण्यात आलेल्या अबकारी करामुळे तसेच सोने व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सोन्याची मागणी कमी राहिली असल्याची माहिती डब्ल्यूजीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी सांगितली. त्यामुळे जास्त वाढ दिसत आहे. या वर्षी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मजबुती आल्याने तसेच नोटाबंदीमुळे खरेदीत वाढ झाली आहे. लग्नसराईमध्ये ४० ते ५० टक्के जास्त सोन्याच्या दागिन्यांची मागणी असते.
 
याव्यतिरिक्त नाण्याची मागणीदेखील वाढली. मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळेही या वर्षी दुसऱ्या सहामाहीत मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. 
 
गुरुवारी दिल्ली बाजारात सोने २७० रुपयांनी स्वस्त होऊन २८,८८० रुपये प्रती दहा ग्रॅमवर आले. गेल्या दीड महिन्यातील सोन्याची ही सर्वात कमी किंमत आहे. जागतिक बाजारांसह भारतीय बाजारातील मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किमतीत सध्या घसरण होत आहे. गेल्या चार दिवसात सोन्याच्या किमतीत सुमारे ६०० रुपयांची घट झाली आहे.
 
 जगभरातील गोल्ड ईटीएफ मागणीत ६८% घट
जा गतिक पातळीवरील ट्रेंड भारताच्या विरुद्ध राहिला. ईटीएफ आणि केंद्रीय बँकांच्या वतीने मागणी कमी झाल्यामुळे मार्च तिमाहीमध्ये जगभरात सोन्याची मागणी १८ टक्क्यांनी कमी होऊन १,०३४ टनावर आली. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान जागतिक मागणी १,२६२ टन  होती. गोल्ड ईटीएफची मागणी ३४२ टनाच्या तुलनेत १०९ टन आणि केंद्रीय बँकांच्या वतीने १०४ टनाच्या तुलनेत ७६ टन मागणी नोंदवण्यात आली. दागिने बनवण्यासाठी ४८१ टन 
सोन्याची मागणी राहिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा थोडा जास्त आहे. यातही सर्वाधिक वाटा भारताचा असून भारतात दागिन्यांसाठी सोन्याची मागणी १६ % वाढली आहे.  या तिमाहीमध्ये सोन्याचा पुरवठा १,०३२ टन राहिला असून हा गेल्या वर्षीच्या १२ % कमी आहे. खदानींमध्ये दुरुस्ती केल्यानंतर ७५४ टन सोन्याचा पुरवठा झाला. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान ७६८ टन सोन्याचा पुरवठा झाला होता. रिसायकलिंगदेखील ३६० टनांपेक्षा २१% कमी २८३ टन झाले. रिसायकलिंग कमी झाल्यामुळेच मागणी वाढली 
असल्याचे लक्षात येते.
 
पुढील स्लाइडवर वाचा, दागिने मागणीत १६ टक्के वाढ... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...