आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST : बेमुदत बंदमुळे कापड व्यापाऱ्यांचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोककाता येथील व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात बुधवारी रॅली काढली होती. - Divya Marathi
कोककाता येथील व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात बुधवारी रॅली काढली होती.
नवी दिल्ली  - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विरोधात एक जुलैपासून देशभरातील कापड  व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये अनेक कपडा व्यापारी संघटनांनी सहभाग घेतला आहे. कपडा उद्योगाला या संपामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान  होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
कपडा उद्योगाचे देशातील प्रमुख केंद्र असलेल्या गुजरातमध्ये  आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कपडा उद्योगातील (टेक्स्टाइल्स इंडस्ट्री) लाखो व्यापारी या व्यवसायाला जीएसटीअंतर्गत  आणण्याचा विरोध करत आहेत. संप संपवण्यासाठी त्यांनी दोऱ्यावरील कर रद्द करणे तसेच एप्रिल २०१९ पर्यंत जीएसटी टाळण्याची मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...