आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाच्या अवमूल्यनाने, कर्मचाऱ्यांचा पगार वाढल्याने टीसीएसच्या नफ्यात 5.9% घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये नफ्यात ५.९ टक्क्यांची घट झाली आहे. या तिमाहीमध्ये कन्सोलिडेटेड नफा ५,९४५ कोटी रुपये राहिला, जो वर्षभरापूर्वी ६,३१७ कोटी रुपये होता. डॉलरच्या तुलनेत रुपया महाग झाला आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेल्या वाढीमुळे नफा कमी झाला आहे. असे असले तरी या दरम्यान महसूल २९,३०५ कोटींवरून १ टक्क्याने वाढून २९,५८४ कोटी रुपये झाला आहे. डॉलरच्या दृष्टीने महसूल ३.१ टक्क्यांनी वाढून ४.६ अब्ज डॉलर राहिला.  
 
एप्रिल-जूनमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ०.६ टक्के मजबूत झाला आहे. क्रिसिलच्या वतीने अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार रुपया मजबूत झाल्यामुळे निर्यातदारांच्या नफ्यात २ ते ३ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.  गेल्या सलग  दोन तिमाहीची आकडेवारी पाहिल्यास जानेवारी - मार्चच्या तुलनेत महसूल ०.२ टक्के आणि नफा १० टक्के कमी झाला आहे.  नफ्यातील ही घसरण दोन वर्षांत सर्वाधिक आहे. ऑपरेटिंग मार्जिन २ टक्क्यांनी कमी होऊन २३.४ टक्के राहिला आहे. एकूण महसुलात १९ टक्के भाग हा डिजिटल सेवेचा राहिला. या दरम्यान टीसीएसच्या ईडी आरती सुब्रमण्यम यांना टाटा सन्सच्या मुख्य डिजिटल अधिकारी बनवण्यात आले. त्या टीसीएसच्या अ-कार्यकारी संचालक देखील कायम राहतील.
 
पगाराच्या बिलात ५३५ कोटी रुपयांची वाढ 
 मुख्य वित्त अधिकारी व्ही. रामकृष्णन यांनी सांगितले की, रुपयामध्ये चढ-उतार झाला नसता तर महसूल ६५० कोटी रुपये जास्त असता. कर्मचाऱ्यांच्या पगारात ५३५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 
 
११,२०२ नवीन भरती, एट्रिशन ११.६ % 
 जून तिमाहीमध्ये कंपनीने एकुण ११,२०२ नवीन भरती केली, आता कर्मचाऱ्यांची संख्या ३.८५ लाख झाली आहे. एट्रिशन दर म्हणजेच कंपनीतील नोकरी सोडून जाण्याचा दर मार्च तिमाहीच्या १०.५ टक्क्यांवरून वाढून ११.६ टक्के झाला आहे. 
 
प्रती शेअर ७ रुपये अंतरिम लाभांश 
टीसीएसने शेअरधारकांसाठी ७ रुपये प्रतिशेअर अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने १६,००० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
 
याआधी खर्च ३ टक्के वाढण्याचा अंदाज होता, आता कमी करून २.४ टक्के केला  
संशोधन संस्था गार्टनरने २०१७ मध्ये जागतिक आयटी खर्चाचा अंदाज दुसऱ्यांदा कमी केला आहे. या आधी या संस्थेने ३ टक्के खर्चाचा अंदाज व्यक्त केला होता, तो आता २.४ टक्के केला. आयटी खर्चात हार्डवेअर, सॉफ्टवेअर, आयटी सेवा आणि दूरसंचार यांचा समावेश आहे. खर्च कमी झाल्यास या क्षेत्राची वाढ कमी राहण्याची शक्यता आहे.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, आयटी उद्योगासाठी डिजिटल बिझनेस ठरला धोक्याचा आणि सर्वाधिक खर्च दूरसंचार सेवेवर... 
 
 
बातम्या आणखी आहेत...